ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

निमिषा थवईने घेतली आमदार महेश बालदी यांची भेट

October 31, 202115:06 PM 44 0 0

उरण (संगीता सचिन ढेरे) : 32 व्या महाराष्ट्र राज्य वरिष्ठ गट तलवारबाजी स्पर्धेमध्ये पनवेलच्या निमिषा थवई हिला कांस्य पदक मिळाले.सदर स्पर्धा शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे झाली.

निमिषा थवई (वय 15) हिने आपल्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर खुल्या गटामध्ये फॉइल या प्रकारात कांस्य पदक मिळविले. प्रसंगी आमदार महेश बालदी यांनी खेळाडूंना बोलून त्यांची विचारपूस करून तिचा योग्य सत्कार केला.योग्य ती मदत खेळाडूंसाठी देऊ असा शब्द ही दिला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी पालक, इतर मान्यवर तसेच प्रशिक्षक मिलिंद ठाकूर, वैभव पेटकर, स्वप्नील मोरे, किरण जोशी, विशाल पाटेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *