ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

भदंत सत्यशिल महाथेरो यांचे निर्वाण

April 26, 202113:38 PM 24 0 0

नांदेड – तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात वास्तव्यास असलेले पुज्य भदंत सत्यशिल थेरो यांचे दि. २३ एप्रिल रोजी श्रामणेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव येथे सायंकाळी ७.०० वा. वृद्धापकाळाने निर्वाण झाले.

यासमयी त्यांचे वय ८५ वर्षे होते. त्यांच्या पार्थिवावर खुरगाव येथे दि. २४ एप्रिल रोजी सकाळी १०.३० वा अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी भदंत पंय्याबोधी थेरो यांच्यासह भिक्खूसंघाची उपस्थिती होती. पुज्य भदंत पय्याबोधी थेरो यांनी त्यांची अखेरच्या क्षणापर्यंत सेवा केली. हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत तालुका परिसरात भदंत सत्यशिल महाथेरो यांनी धम्मचळवळ गतीमान केली. बुध्दभुमी माळवटा येथे त्यांनी सतत पंधरा वर्ष धम्मपरिषदेच्या माध्यमातून लोकांमध्ये धम्म रुजवण्यांचे कार्य केले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *