ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

नीता भाभी और मुकेश भय्या, यह तो सिर्फ ट्रेलर है, अंबानींच्या घराबाहेरील कारमध्ये लेटर

February 26, 202113:48 PM 102 0 0

देशातील दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील एंटेलिया या निवासस्थानाबाहेर गुरूवारी संध्याकाळी स्फोटकांनी भरलेली एक स्कॉर्पिओ गाडी आढळल्याने एकच खळबळ उडाली. गाडीत जिलेटीन या स्फोटकांच्या सुट्टया कांड्या होत्या अशी माहिती पोलिसांनी दिली. याशिवाय गाडीत एक पत्रही सापडल्याची माहिती समोर आली आहे.

“नीता भाभी और मुकेश भैय्या, ये तो ट्रेलर है” अशा आशयाचं पत्र पोलिसांना अंबानींच्या घराबाहेर असलेल्या स्कॉर्पिओमधून सापडल्याची माहिती आहे. पण पोलिसांनी चिठ्ठीतील मजकुराबाबत सविस्तर माहिती अद्याप दिलेली नाही. तसेच, अंबानी यांच्या ताफ्यातील आणखी काही गाड्यांच्या नंबर प्लेट पोलिसांना सापडल्या असल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, अंबानी यांच्या घरापासून काही अंतरावरच स्कॉर्पिओ उभी होती. गाडीत स्फोटके असल्याची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या व वाहनाची कसून तपासणी करण्यात आली. या घटनेनंतर पोलिसांनी अंबानींच्या घराबाहेर बंदोबस्तात वाढ केली असून जलद प्रतिसाद पथक तैनात करण्यात आले आहे. कारमायकल रोडवर मोठया प्रमाणावर पोलिसांसह कमांडोही तैनात करण्यात आले आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलीस तपासत आहेत.
तर, “उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील घराच्या काही अंतरावर एका स्कॉर्पिओ गाडीमध्ये जिलेटीन स्फोटकाच्या २० कांड्या सापडल्या आहेत. या घटनेची संपूर्ण चौकशी मुंबई गुन्हे शाखेचे पोलीस करीत असून चौकशीतून लवकरच सत्य समोर येईल”, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *