ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

 आधुनिक युगातील दुरदृष्टी नेता विकास पुरूष नितीनजी गडकरी

May 21, 202215:39 PM 38 0 0

कोणत्याही देशाच्या विकासात रस्ते महत्वाची भूमिका बजावित असते.रस्त्यांशिवाय विकासाची परिकल्पना करता येत नाही.परंतु भारतात कमी अवधीत रस्त्यांची परिकल्पना पुर्ण करुन नितिनजी गडकरी यांनी विकासाचा मार्ग मोकळा करून नवा इतिहास स्थापित केल्याचे दिसून येते.आजच्या आधुनिक युगात देशात जे काही रस्त्यांचे जाळे व उड्डाणपूल दिसत आहे त्याचे संपूर्ण श्रेय केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनाच जाते.कारण रस्त्यामुळेच विकासाची दिशा ठरत असते.नितीनजी गडकरी यांच्या बुध्दीमत्तेचा व दुरदृष्टीतेचा वापर अनेक देश करीत आहे.त्यामुळे विकासाच्या बाबतीत गडकरींचे नाव मोठ्या सन्मानाने व आदरतीथ्याने घेतले जाते.गडकरींनी जेव्हा राजकारणात पाऊल टाकले तेव्हा पाहूनच त्यांच्या मनात विकासाचे विकासचक्र फिरत असावे.जनुकाय महाभारतातील संजयच म्हणावे लागेल. गडकरींनी विकासाची सुरूवात महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री असतांना पासून सुरू केली.यानंतर विकासाच्या बाबतीत मागे वळून कधीच पहाले नाही.2014 मध्ये नितीनजी गडकरी केंद्रीय मंत्री बनले तेव्हा पासून आजपर्यंत देशात हजारो किलोमीटरचे महामार्ग बनवून 135 कोटी जनतेला होणारा त्रास दुर झाला, त्याचबरोबर दळणवळण, व्यापारी वाहतूकीला मोठ्या प्रमाणात चालना मिळाली सोबतच गावागावात रोड बनवून गावतीथे सिमेंट रोड हि संकल्पना साकार होतांना दिसत आहे.यामुळे हजारो लोकांना रोजगार सुध्दा मिळाला.देशातील नवीन महामार्गामुळे हजारो किलोमीटरची वाहातुक सर्वांसाठी सुलभ झाल्याचे दिसून येते.यामुळे अनेक बाजारपेठांशी ताबडतोब संपर्क साधता येतो.गडकरींची कला अवगत करण्यासाठी विदेशातील अनेक एक्स्पर्ट त्यांच्याशी सल्लामसलत करतात.त्यामुळेच आज जगात विकासाच्या बाबतीत गडकरींचे नाव मोठ्या सन्मानाने घेतले जाते.महाराष्ट्राच्या बाबतीत विचार केला तर महाराष्ट्राचा विकास सुवर्ण अक्षरांनी लिहावा या पध्दतीने गडकरींनी कार्य केल्याचे दिसून येते.आज नागपूरात आपल्याला मेट्रो धावतांना दिसत आहे.त्याचे संपूर्ण श्रेय माननीय गडकरींना जाते.मेट्रोमुळे लोकांना वाहतुकीची मोठी सुविधा झाली.त्याचबरोबर अनेक बेरोजगारांना रोजगार देण्याचा मार्ग सुलभ केला.संपुर्ण महाराष्ट्रात उड्डानपुल व सिमेंट रोडमुळे महाराष्ट्राची संपूर्ण कायापालट झाल्याचे दिसून येते.यावरून स्पष्ट होते की महाराष्ट्रासह देशाला खरा विकासाचा मार्ग दाखविला असेल तर नितीनजी गडकरी यांनी त्यामुळेच त्यांना आज संपूर्ण देश सन्मानाने व आदराने सलाम करतो.राज्याच्या विकासासोबत देशाचा विकास सुरू असतांनाच राज्याची व देशाच्या संस्कृतीचे जतन करण्याची धुरा सांभाळण्याचे काम गडकरींनी केले. नागपूरमध्ये खासदार महोत्सवाची सुरुवात 2018 पासून झाली.त्यानिमित्याने दरवर्षी नागपूरात खासदार महोत्सव साजरा केल्या जातो.यात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.यात खास करून महाराष्ट्रासह भारतीय संस्कृतीचा वारसा पथनाट्याच्या व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवील्या जाते.या कार्यक्रमात मुख्यत्वेकरून संपूर्ण धर्माची जोपासना आपण कशी टीकवायची याचेही हुबेहूब चित्रिकरण पहायला मिळते.

यामुळे महाराष्ट्राचा वारसा दिसून येतो.नव्या पिढीला आपल्या संस्कृतीची चालना देण्याचे काम माननीय श्री नितीनजी गडकरी यांनी खासदार महोत्सवाच्या निमित्ताने आतापर्यंत दाखविले आहे.पुढेही आपली संस्कृती टिकून राहावी या उद्देशाने याहीवर्षीही आपल्याला खासदार महोत्सवात पहायला मिळाले आणि आता खासदार क्रीडा महोत्सवाला सुरुवात करून खेळाडूमध्ये नवीन उर्जा निर्माण करण्याचे काम गडकरी करीत आहे.सध्याच्या परिस्थितीत भारतातील अनेक राज्यांमध्ये सांस्कृतिक वारसा लुप्त होतांना दिसत आहे.परंतु विदर्भासह महाराष्ट्राला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा सारखा पूत्र मिळाल्याने खासदार महोत्सवाच्या निमित्ताने सांस्कृतिक वारसा जिवित झाल्याचे दिसून येते.आज गडकरींच्या पुण्याईने नागपूरसह संपूर्ण भारतात उड्डाण पुलांचा बोलबाला दिसून येतो.त्यामुळेच त्यांना उडानपुलाचे प्रनेते सुध्दा म्हणतात.नागपूरच्या विकासाची गोष्ट केली तर आज नागपुरचा संपूर्ण कायापालट झाल्याचे दिसून येते.हीबाब संपूर्ण देश अनुभवत आहे.नागपूर हे भारताचे मध्यवर्ती ठिकाण व केंद्रबिंदू आहे.आपातकालीन परिस्थितीत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नागपूरची निवड केली जाते.त्या अनुषंगानेच नागपूरचा विकास होत असावा.विदर्भाला संतांची भूमी म्हणून सुद्धा ओळखले जाते.संत, थोर महात्म्यांच्या आचार विचारांची जपणूक हीच खरी संस्कृती होय.आज आपली संस्कृती काय आहे हे सर्वांनाच माहीत आहे.परंतु गडकरींच्या अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सांस्कृती जोपासण्याचे कार्य होत असल्याचे दिसून येते.आजच्या पिढीला आपल्या संस्कृतीचा विसर पडत असल्याचे दिसून येते.खासदार महोत्सवाच्या माध्यमातून आपल्या संस्कृतीला जिथे-कुठे खिंडार पडले असेल.त्याला दुरुस्त करण्याचा विडा गडकरींनी घेतल्याचे दिसून येते.1947 नंतर नागपूरमध्ये अनेक खासदार होवून गेले.परंतु गडकरींचा काळ हा वाखाणण्याजोगा आहे.कमी कालावधीत महाराष्ट्रासह संपूर्ण भारताचा विकास रोडच्या व उड्डाणपूलाच्या माध्यमातून करून देशाला विकासाची नवीन दिशा दिली आहे.याचाच गाजावाजा आज आपल्याला जगात पहायला मिळतो.
त्यामुळे गडकरी भारताचेच नाही तर जगाचे विकास पुरूष आहेत असे मी समजतो.खरोखरच महाराष्ट्राचा व देशाचा विकासाचा मार्ग मोकळा करणारा आणि सांस्कृतिक वारसा टिकविणारा पुत्र नागपूर भुमित जन्माला आला ही देशासाठी गौरवाची बाब आहे.ज्या दिवसापासुन खासदार झाले तेव्हा पासून त्यांचा कामाचा सपाटा जोरदार सुरू आहे.त्याचप्रमाणे त्यांच्या कामाची चर्चा भारतातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे ही नागपूरकरांसाठी व महाराष्ट्रासाठी मोठी अभिमानाची गोष्ट आहे.गडकरींनी विकासाची सुरूवात उड्डाण पूलापासुन केली ती आज विकासाच्या शिखरापर्यंत जाणवु ठेपली आहे आणि आता विकासासोबतच सांस्कृतीची व क्रीडा क्षेत्राची जोपासना करण्याचे दायित्व त्यांनी स्वीकारल्याचे दिसून येते.यासाठी त्यांनी आपली संपूर्ण ताकद पुर्णपणाला लावली आहे.भारतात अनेक ठिकाणी आपल्याला जातीय दंगली दिसून येतात.परंतु नागपूरमध्ये कोणतीच जातीय दंगल अथवा टोकाचे मतभेद व वाद झाल्याचे दिसून येत नाही.नागपूरमध्ये संघ कार्यालय, दीक्षाभूमी,ताजबाग,गणेश टेकडी,चर्च इत्यादी अनेक धर्मांची पुरातन स्थळे आहेत.त्याचे जतन सर्वधर्मीय करतात.गडकरी यांचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व धर्मांच्या लोकांना घेऊन चालने व समाजामध्ये सर्वच धर्माविषयी आदराची भावना निर्माण करून सर्वांना एकसुत्रीत बांधून ठेवण्याचे महत्वाचे काम गडकरींनी केले आणि करीत आहेत.खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या माध्यमातून समाज कार्यासह लोकांनी आपल्या संस्कृतीचे जतन कसे करता येईल याची जाणीव करून देण्याचे कार्य गडकरी करीत आहे.नागपुरला राजकीय दृष्ट्या संघभुमि म्हणून भारतासह जगभर ओळखले जाते.परंतु आजही नागपूरमधील हिंदू-मुस्लिम-शिख-ईसाइ-बौध्द एकोप्याने राहतात.ही नागपूरसाठी व नागपूरकरांसाठी सन्मानाची बाब आहे.गडकरी नागपूरचे खासदार झाले म्हणूनच विकास झाला आणि त्यांच्यामुळेच संस्कृतीचे जतन कसे करावे याची शिकवण खासदार महोत्सवाच्या माध्यमातून युवकांना मिळत असते.आज गडकरींच्या कामाची शैली व एकाग्रता लक्षात घेता ते भारतासाठी “विकासपुरुष”आहे.खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव पुनर्जीवीत करण्याचे काम करीत आहे.खासदार महोत्सवामध्ये कला, संस्कृती, साहित्य यासोबतच मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे दर्शन सुध्दा होते.1997 मध्ये असाच सांस्कृतिक कार्यक्रम गडकरी यांनी स्वातंत्र्याला 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने यशवंत स्टेडियम येथे आयोजित केला होता.त्यातही आपल्याला कला, साहित्य व सांस्कृतिची जडन-घडन दिसून आली.असे विकास पुरूष केंद्रीय मंत्री सन्माननीय नितीनजी गडकरी यांची विकासाची गती उच्च शिखरावर जावो आणि महाराष्ट्रासह भारताचा विकास आणखी गतीशील होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

लेखक

रमेश कृष्णराव लांजेवार.

मो.नं.9921690779, नागपूर.

Categories: लेख, साहित्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *