ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

अब की बार …पेट्रोल नव्वद पार..,दरवाढीविरोधात युवासेनेची जालन्या त निदर्शने इंधन खरेदीतील दलालांचे उच्चाटन करा – अभिमन्यू खोतकर

December 10, 202009:35 AM 94 0 0

जालना ( प्रतिनिधी) : पेट्रोल व डिझेलच्या किमतीत दिवसेंदिवस भरमसाठ वाढ होत असल्याने या इंधन दरवाढीच्या निषेधार्थ युवा सेनेच्या वतीने राज्य विस्तारक अभिमन्यू अर्जुनराव खोतकर यांच्या नेतृत्वाखाली जालना शहरात तीव्र निदर्शने करण्यात आली. शेतकरी व ग्राहक यांच्यामधील मध्यस्थांचे उच्चाटन करण्याची वल्गना करणाऱ्या केंद्र सरकारने इंधन खरेदीतील दलालांचे उच्चाटन करावे .अशी मागणी युवा सेनेचे राज्य विस्तारक अभिमन्यू खोतकर यांनी यावेळी बोलताना केली. इंधन दरवाढी विरोधात रोष व्यक्त करण्यासाठी बुधवारी ( ता. ०९) वीर सावरकर चौक येथे युवा सेना राज्य विस्तारक अभिमन्यू खोतकर यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व युवा सैनिक एकञ आले. या वेळी युवा सेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे, जिल्हा समन्वयक अंकुश पाचफुले, भरत सांबरे, गटनेते विजय पवार, संदीप नाईकवाडे, राम सतकर, संताजी वाघमारे,गोपीकिशन गोगडे, दिनेश भगत, घनश्याम खाकीवाले, कमलेश खरे,किशोर नरवडे, योगेश रत्नपारखे, अॅड. बबन मगरे,नागेश डवले, नितीन जांगडे, राजू दुसाने, अक्षय वल्लाकट्टी, संतोष परळकर,दीपक हवाले, आकाश टेकुर, नरेश जांगडे,अक्षय भगत, यांची प्रमुख उपस्थिती होती.

भगवे रूमाल आणि निषेधाचे फलक हाती घेतलेल्या युवा सैनिकांनी मोदी सरकार हाय,,,हाय ,,,,अब की बार….पेट्रोल- डिझेल नव्वद पार… इंधन दरवाढ कमी,,झालीच पाहिजे.. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ,,युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा विजय असो…अशा गगनभेदी घोषणा देत संपूर्ण बाजारपेठ दणाणून सोडली.  युवा सेना राज्य विस्तारक अभिमन्यू खोतकर यावेळी म्हणाले की, महागाईच्या मुद्द्यावरून तत्कालीन सरकार विरोधात आग पाखड करत सत्तेवर आलेल्या केंद्रातील मोदी सरकारने सन २०१४ नंतर पेट्रोल व डिझेलच्या किमती कमी करण्या ऐवजी दिवसेंदिवस दरवाढ केली आहे. दररोज २५ ते ३० पैशांनी वाढणाऱ्या दराने सर्वसामान्य शेतकरी, व्यापारी, कामगार व मजूर इंधनाच्या दरवाढीमुळे होरपळून निघत आहेत. असे सांगून अंतरराष्ट्रीय बाजार पेठेचे नांव करून भाववाढ करण्या ऐवजी इंधनावरील कर कमी करावा. आणि दरवाढ मागे घ्यावी अशी आग्रही मागणी अभिमन्यू खोतकर यांनी केली. तथापि अंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दर कमी झाल्यास आपल्या देशात दर का कमी होत नाही? असा प्रश्न ही अभिमन्यू खोतकर यांनी यावेळी उपस्थित केला.
युवा सेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे म्हणाले,आधीच कोरोना मुळे देश व राज्यातील जनता आर्थिक अडचणीत सापडली असतांना केंद्र सरकार महागाई च्या आगीत ढकलत आहे. असा आरोप करत दरवाढ मागे न घेतल्यास माजी मंत्री अर्जुनराव खोतकर, जिल्हाप्रमुख भास्करराव आंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राज्य विस्तारक अभिमन्यू खोतकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाभरात युवा सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भाऊसाहेब घुगे यांनी दिला.  भरत सांबरे, अंकुश पाचफुले यांची या वेळी समायोजित भाषणे झाली.
दरम्यान एका शिष्टमंडळाने अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांची भेट घेऊन दिलेल्या लेखी निवेदनात सर्वसामान्यांना न परवडणारी इंधन दरवाढ मागे घेऊन केंद्र शासनाने दिलासा द्यावा अशी मागणी केली आहे. या आंदोलनात निलेश शिंदे, विठ्ठल एखंडे, प्रकाश गाढे, सखाराम वाजे, बळीराम गाढे, संजय गोन्टे, उमेश भुरे, भूषण सांबरे, कारभारी घोडके, आप्पासाहेब उगले, देवेंद्र बुंदेले, शुभम सांबरे, सचिन सहाणे , दीपक वैद्य, यांच्या सह पदाधिकारी व युवा सैनिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *