ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

जागतिक महिला दिना निमित्त नर्स भागिनींचे सत्कार

March 10, 202213:27 PM 44 0 0

जागतिक महिला दिना निमित्त दि.८ मार्च रोजी येथील अग्रवाल महिला मंडळ च्या वती ने ग्रामीण/शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र, पानी वेस जालना येथील सेवा देणाऱ्या सर्व नर्स भागिणी, ज्यांनी गेल्या दोन वर्षा पासून सातत्याने कोरोना सारख्या जागतिक महामारीला लढ़ा दिला व त्या कठीण काळात ही सातत्याने रुग्ण सेवा केली अश्या ४० नर्सेस भागिनींचे चे कोरोना योद्धा म्हणून प्रशस्ती पत्र, स्टोल व मिठाई देऊन सत्कार करण्यात आले. तसेच या प्रसंगी तेथील महिला डॉक्टर्स डॉ शीतल सोनी, डॉ संगीता राजे, डॉ प्रियंका चांडक व डॉ श्रद्धा कनोजे यांचे ही सत्कार करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला महिला मंडळ च्या अध्यक्षा सौ. शोभा अग्रवाल यानीं आपल्या सर्वांचे स्वागत करून या नर्स भागिनींने केलेल्या सेवे बद्दल त्यांचे गौरव करुन महिला दिनानिमित्त आपले विचार मांडले. त्या नंतर डॉ शीतल सोनी यांनी सर्वांचे यथोचित मार्गदर्शन केले. या वेळी अग्रवाल महिला मंडळ चे सावित्री मल्लावत, नीता अग्रवाल, सीमा पंच, सुषमा अग्रवाल, ज्योती अग्रवाल, लीलाबाई हिंगोलीवाले, शारदा चौधरी, पदमा अग्रवाल, सुनंदा तम्बाकुवाला, अनिता अग्रवाल, आशा बगड़िया, कविता पित्ती सह इतर बहुसंख्य सदस्य उपस्थित होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *