ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

ओबीसी समाजालना न्याय मिळाला- बाबासाहेब वानखेडे

July 22, 202212:17 PM 20 0 0

जालना(प्रतिनिधी) : बांठिया आयोगानं इम्पोरिकल डेटा सर्वोच्च न्यायालयात सादर केला. तसेच न्यायालयाच्या आदेशानुसार ट्रिपल टेस्टची पुर्तता देखील करण्यात आली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणानुसार निवडणूका घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे.

या आरक्षणासाठी बांठिया आयोगासह पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री आमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी अन्न पुरवठामंत्री छगनरावजी भुजबळ, चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंढे आदिंच्या प्रयत्नामुळे व ओबीसी समाज बांधवांच्या लढ्यामुळे ओबीसी समाजाला न्याय मिळाला, असल्याची प्रतिक्रिया अखिल भारतीय ओबीसी एकता परिषदेचे अध्यक्ष बाबासाहेब वानखेडे यांनी दिली.

महाराष्ट्रामध्ये अनेक महानगरपालिका व नगर पालिका निवडणूका प्रलंबीत आहे. या निवडणूका ओबीसी आरक्षण लागु झाल्यानंतर व्हाव्यात अशी भुमिका ओबीसी समाज बांधवांसह महाराष्ट्रातील नेत्यांनी घेतली होती. तसेच ओबीसी आरक्षण मिळवण्यासाठी राज्य सरकारकडून न्यायालयीन लढाई लढली जात होती. यावर सुनावणी झाली असून, सर्वोच्च न्यायालयाने बांठियार आयोगाचा अहवाल मान्य केला. त्यामुळे महाराष्ट्रात देखील ओबीसी आरक्षणाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. या निर्णयाचे जालना शहरात स्वागत करण्यात आले. यावेळी बाबासाहेब वानखेडे यांच्यासह बाबासाहेब गाडेकर, शिवराज घाडगे, रामेश्‍वर खांडेभराड, गंगुबाई वानखेडे, सुरेश रत्नपारखे, गणेश रत्नपारखे, सुरेश मानकस, रामेश्‍वर खांडेभराड, परमेश्‍वर खांडेभराड, लक्ष्मण हरकळ, आदिंसह अनेकांची उपस्थिती होती.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *