ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठीचा लढा तीव्र करणार – ओबीसी जनमोर्चा समन्वय समितीचा निर्णय

December 6, 202015:26 PM 180 0 1

सातारा  – ओबीसी समाजाला मंडल आयोगामुळे मिळालेले २७ टक्के आरक्षण वाचविण्यासाठी व त्याचे संरक्षण करण्यासाठी ओबीसी समाज बांधवांचा लढा अधिक तीव्र करणार असल्याचा निर्धार ओबीसी जनमोर्चाच्या समन्वय समितीच्या बैठकीत करण्यात आला.फलटण येथील डॉ. विजयराव बोरावके पतसंस्थेच्या सभागृहांमध्ये घेण्यात आलेल्या ओबीसी जनमोर्चाच्या समन्वय समितीच्या बैठकीत वरील निर्धार करण्यात आला.

ओबीसी समाज मुळातच राजकीय, सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या आज ही मागासलेला आहे. लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये या समाजाला देशाच्या समाजकारणात व राजकारणात संधी मिळालेली नाही. नव्याने कोणी जर ओबीसी मधून आरक्षण मागणार असेल तर त्याला आमचा तीव्र विरोध राहील. कसल्याही परिस्थितीमध्ये मराठा ओबीसीकरण होऊ देणार नाही. यासाठी महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील ओबीसी समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, याची नोंद सर्वच राज्यकर्त्यांनी घ्यावी. तसेच भविष्यात ओबीसी जनमोर्चाच्या माध्यमातून फलटण तालुक्यासह सातारा जिल्ह्यामध्ये ओबीसी बांधवांचे संघटन मजबूत करण्यात येणार आहे. वेळ प्रसंगी रस्त्यावरील लढाईला सुद्धा आता ओबीसी समाज तयार झालेला आहे. मंडल आयोगा अंतर्गत ओबीसी समाजाला मिळालेल्या सर्व सोयी सुविधा सरकारने तात्काळ उपलब्ध करून द्याव्यात तसेच ओबीसी समाजाची जनगणना कसल्याही परिस्थितीत ताबडतोब करण्यात यावी. इ. मागण्यांचा उहापोह या मिटींगमध्ये करण्यात आला. आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष कराल तर गंभीर परिणामाला सामोरे जावे लागेल अशी मते विविध मान्यवर समाज बांधवांनी व्यक्त केली.
यावेळी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती डॉ. विजयराव बोरावके, श्रीराम कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब शेंडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, माजी सभापती शंकरराव माडकर, दादासाहेब चोरमले, पै. बजरंग गावडे, मिलिंद नेवसे, दशरथ फुले, प्रतिक क्षिरसागर, राजेंद्र नेवसे, अजय माळवे, सुभाष भांबुरे, नासिर शिकलगार, पिंटू इवरे, बाळासाहेब ननावरे, रघुनाथ कुंभार, अमोल कुमठेकर, बापूराव काशीद, परशुराम फरांदे आदींनी मार्गदर्शन केले.
तसेच सहदेव शेंडे, दत्तात्रय बरळ, किशोर तारळकर, रहीम तांबोळी, डि.वाय. शिंदे, प्रवीण नाळे, नितीन नेवसे अनिल शिंदे, प्रवीण उंडाळे, सूनील भुजबल, राजेंद्र भागवत, राजेश बोराटे, ज्ञानदेव झगडे इत्यादी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *