ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

दक्षता जनजागृती सप्ताहनिमित्त सातारा येथे अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतली भ्रष्टाचार निर्मुलनाची शपथ

October 29, 202118:03 PM 67 0 0

सातारा, दि.29 (विद्या सुरजकुमार निकाळजे) : दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना भ्रष्टाचार निर्मुलनाची शपथ दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधिक्षक अशोक शिर्के, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विजयकुमार पाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी देविदास ताम्हाणे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. दक्षता जनजागृती सप्ताहनिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. यामध्ये ग्रामसभा, ऑनलाईन चर्चासत्र, भ्रष्टाचार विरोधी जनजागृती, रांगोळी स्पर्धेचे आयोजन, खाजगी-प्रवासी वाहतुक करणाऱ्या चार चाकी व तीनचाकी वाहनांची रॅली असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले असल्याचे श्री. शिर्के यांनी यावेळी सांगितले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *