ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

ओमायक्रॉनमुळे उरणमध्ये खबरदारी गर्दीचे समारंभ, धार्मिक कार्यक्रमांवर येणार बंधने

December 4, 202113:50 PM 73 0 0

उरण (संगिता पवार) : ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या प्रकाराला रोखण्यासाठी उरण तालुक्यात प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे. उरण तालुक्यातील डॉक्टर ,व सामाजिक कार्यकर्ते यांची नुकतीच उरण तहसील कार्यालयात मिटिंग घेऊन सूचना हि दिल्या . गर्दीचे समारंभ, धार्मिक कार्यक्रमांवर बंधने घालण्यात येणार आहेत. कोरोनाचे नियमही कडक करण्यात येणार असून मास्क नसणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिले.ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर उरण तालुक्यातील कोविड परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. यावेळी समाधानाची बाब म्हणजे उरण तालुक्यात १ लाख ५५ हजार ५५५ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. यामध्ये दोन डोस घेतलेल्यांची संख्या १ लाख ४ हजार १५७ एवढी आहे पोलीस, प्रशासकीय यंत्रणेला सूचना देण्यांत आल्या .

डोस पूर्ण झालेले ५१ हजार ३९८ नागरिक आहेत.लसीकरणात उरण तालुका हा रायगड जिल्ह्यात दुसरा आहे.
ओमायक्रॉन या नवीन विषाणूच्या पार्श्वभूमीवर सगळीकडे सतर्कता बाळगण्यात येत असून उरण तालुक्यात खबरदारीचे उपाय राबवले जाणार आहेत. नागरिकांनी गर्दीचे समारंभ व कार्यक्रम टाळावेत. मास्व व सॅनिटायझरचा वापर करावा. समारंभ आणि कार्यक्रमांमध्ये गर्दी होऊ नये यासाठी पोलीस आणि प्रशासनाला काळजी घेण्याचे आदेश देण्याच्या सूचना करण्यात आली असल्याचे उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी सांगितले.
या बैठकीस उरण तहसिलदार भाऊसाहेब अंधारे ,निवासी नायबतहसीलदार गणपत धुमाळ , उरण तालुका अधिकारी डॉ. राजेंद्र इटकरे ,इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय वैदकीय अधीक्षक डॉ .गौतम देसाई ,डॉ .सुरेश पाटील ,डॉ .विकास मोरे डॉ, सत्या ठाकरे ,,डॉ. प्रीती गाडे ,डॉ. भोसले ,डॉ. अतुल बोंद्रे ,,डॉ. प्रकाश नाखवा ,डॉ,.प्रकाश दाभाडे ,डॉ. निलेश वीर ,,डॉ पंकज पाटील ,व इतर डॉक्टर उपस्थित होते .

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *