दिनांक २४ जानेवारी रोजी जालना येथील बाथ्री तेली एकता महिला मंडल यांचा वतीने दुसऱ्यांदा १०वी आणि १२वी च्या गुणवंत विद्यार्थीयांच्ये सत्कार सोहळा उत्साहात बाथ्री तेली समाज भवन येथे संपन्न झाला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पुरवठा अधिकारी रीना बसैये, बाथ्री तेली एकता महिला मंडळाची अध्यक्षा-कविता लिधोरिये, उपाध्यक्ष-आशा रोडिया यांची उपस्तीथी होती. कार्यक्रमाची सुरवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली, या प्रसंगी कविता लिधोरिये यांचे हस्ते रीना बसैये यांचा सत्कार शाल, श्रीफळ आणि पुष्प हार देऊन करण्यात आले.
या वेळी स्वागत गीत भजनाने प्रेमलता लिधोरिये यांनी कार्यक्रमाची सुरवात केली सोबत समाजाच्या लहान मुलांनी आपली कला सादर केली या मध्ये कुमारी श्रद्धा लिधोरिये आणि पियुष रोडिया यांनी गीटार वाजवून सर्व मुलांचे प्रोत्साहन वाढवले कार्यक्रमाचे प्रास्ताविक शीतल चौंडीये यांनी केले सोबत या मध्ये १०वी आणि १२वी मधील विद्यार्थी अतुल चौंडीये, कृष्णा जेठे, यश चौंडीये, तेजस चौंडीये, राहुल कुरलीये, यश रठय्ये, निकिता जेठे, सीमा मंडोरे, वैष्णवी लिथोरिय, श्रद्धा कुरलीये, वैष्णवी कुरलीये, अक्षय बसैये, आदित्य कुरलीये, जयेश नरवय्ये, मोहित चौंडीये या विद्यार्थीचे सत्कार प्रमाणपत्र, स्मृति चिन्ह एवं पुष्प द्वारे करण्यात आले
कार्यक्रमात भारतीय तेलिक महासंघचे अध्यक्ष किशनलाल जेठे यांचा तर्फे 2 गुणवंत विद्यार्थी यांना प्रोत्साहन परबक्षीस दिले गेले. या वेळी बसैये मॅडम यांनी विद्यार्थीना भावी भविष्यसाठी शुभेच्छा देऊन विद्यार्थीनी भविष्यात काय करायचा आहेत त्याचा नियोजन करावा तसेच आई-वडिलांनी हि मुलांना प्रोत्साहन द्यावा असे मनोगत त्यांनी व्यक्त केले. महिला मंडळाच्या वतीने कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी आरती चौंडीये, उमा लाचुरीये, सारिका सातपुरिये, ललिता चौंडीये, कल्पना चौंडीये, ज्योती बंसिलें, शीतल चौंडीये, कीर्ती लिधोरिये, कविता लिधोरिये, प्रेमलता लिधोरिये, नम्रता चौंडीये, आशा रोडिया, लता लिधोरिये यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन नम्रता चौंडीये यांनी केले तसेच सूत्र संचलन दीपक रोडिया यांनी केले.
या वेळी श्री नितीन साहू यांच्या वतीने पुढच्या वर्षी १०वी मध्ये मेरिट येणाऱ्या विदयार्थी साठी २१२१ रुपयाचे दोन बक्षिसे जाहीर केली या कार्यक्रमा मध्ये समाजातील सर्व महिला एवं पुरुष तसेच विदयार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते
Leave a Reply