ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

जालना जिल्हा काँग्रेस सेवादलाच्या वतीने कामगार काँग्रेस चे प्रदेश अध्यक्ष आदरणीय मोहम्मद बदरुजमा यांचा भव्य सत्कार

December 7, 202121:10 PM 59 0 0

असंघटित कामगार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय मोहम्मद बदरुजमाजी जालना येथे आले असता जालना जिल्हा काँग्रेस सेवादलाच्या वतीने जिल्हा कार्याध्यक्ष अब्दुल रफीक सर जिल्हा समन्वयक बाबासाहेब सोनवणे यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला . यावेळी कामगार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय मोहम्मद बदरुजमाजी यांनी कार्यकर्त्यां सोबत जिल्ह्यातील नगरपंचायतीच्या निवडणूक संदर्भात तसेच रोजगार , शिक्षण , पक्ष संघटन वाढी व शासकीय कर्मचारी संघटना सोबत जोडणे , श्रम कार्ड नोंदणी ,संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी असंघटित कामगार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शेख शमशुद्दीन भाई , सेवादलाचे जिल्हा कार्याध्यक्ष अब्दुल रफीक सर , जिल्हा समन्वयक बाबासाहेब सोनवणे , महिला जिल्हा अध्यक्ष मंगल ताई खांडेभराड , किसान सेलचे जिल्हाध्यक्ष नारायण वाडेकर , विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष जावेद बेग , रघुनाथ ताठे , घनसावंगी तालुका अध्यक्ष साबेर शैख , शहराध्यक्ष वसीम कादरी , जयश्री साळवे , शेख इम्रान , शेख इरफान , इकबाल कुरेशी , असलम शेख , जावेद खान यांच्या सह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते .

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *