ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

लायन्स क्लब ऑफ उलवे जेम्स यांच्या वतीने अतिवृष्टी ने बेघर झालेल्या आदिवासी कुटुंबास मदतीचा हात

July 16, 202212:45 PM 25 0 0

उरण (तृप्ती भोईर) : दि. १५ जूलै २०२२ रोजी लायन्स क्लब ऑफ उलवे जेम्स यांनी सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम केले आहे व या अनुषंगाने एक स्तुत्य उपक्रम राबवला. तो म्हणजे उरण तालुक्यातील जांभुळपाडा येथील आदिवासी वाडीतील मयत राम महादु कातकरी यांच्या कुटुंबीयांवर अतिवृष्टीमुळे बेघर होण्याची वेळ आली आणि या दुर्दैवी व संकटात सापडलेल्या आदिवासी कुटुंबास मदतीचा हात या संस्थेच्या वतीने पुढे करण्यात आला.
जांभूळ पाडा वाडी वर मयत राम महादू कातकरी यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी दिनांक १२/०७/२०२२ मंगळवार रोजी जांभूळ पाडा कातकरी वाडी, तालुका उरण येथील अतिवृष्टी मुळे झोपडी अंगावर कोसळून राम महादु कातकरी या आदिवासी बांधवाचा दुर्दैवी मृत्यू झाला, आणि त्यांच्या पत्नीला दुखापत झाली. सदर घटनेची माहिती कळताच लायन्स क्लब ऑफ उलवे जेम्सच्या पदाधिकारी नी घटनास्थळी जाऊन, सदर घटनेची विचारणा केली व त्या दुःखी कुटुंबियांना त्यांच्या आवश्यकते नुसार मदत केली व त्यांचे मनोबल वाढविले.
लायन्स क्लब ऑफ उलवे जेम्स च्या वतीने,२ चटई,५ किलो तांदूळ, १/२ किलो चवळी, १ कि.तुरडाळ, १ किलो मूग डाळ व घरातील चांगल्या ३ साड्या व २ शाल इत्यादी सामान देण्यात आले.

‌‌ सदर उपक्रमास अध्यक्ष लायन गौरी देशपांडे, डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन ला .मिलिंद पाटील, सचिव ला .हेमंत लोणकर, आदिवासी उत्कर्ष उपक्रम चेअरपर्सन ला वर्षा लोकरे, ला उमेश जाधव इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *