ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

राजे संभाजी सेवाभावी संस्थेच्या वतीने वखारी येथे जल जीवन मिशन जनजागृती कार्यक्रम संपन्न

December 24, 202113:49 PM 42 0 0

जालना प्रतीनिधी : केंद्र शासन पुरस्कृत सुरू असलेला राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम जलजीवन मिशन मध्ये प्रत्येक ग्रामीण व्यक्तीस स्वयंपाकासाठी आणि घरगुती वापरासाठी शुद्ध व पुरेसा आणि शाश्वत पाणीपुरवठा सर्वकाळ आणि सर्व परिस्थितीत सोयीच्या ठिकाणी उपलब्ध करून देणे हे उद्दिष्ट आहे यात फक्त योजना पूर्ण करणे एवढाच उद्देश नसून कार्यक्षम पाणीपुरवठ्याची एक शाश्वत सेवा उपलब्ध करणे हा त्यामधील प्रमुख गाभा आहे केंद्र शासनाच्या कार्यरत मार्गदर्शक सूचनांनुसार जलजीवन मिशनची राज्यात अंबलबजावणी करणे आणि मिशन अधिकाधिक परिणामकारक होण्याकरिता तसेच ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबास घरगुती कार्यात्मक न जोडणी द्वारे विविध गुणवत्तेचे पाणी प्रतिमाणसी प्रतिदिन किमान 55 लिटर या प्रमाणात उपलब्ध करून देण्यासाठी आज दिनांक 23 गुरूवार रोजी जालना तालुक्यातील वखारी येथे जल जीवन मिशन अंतर्गत जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.यावेळी जालना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री. मनुज जिंदल यांच्या उपस्थितीत जल जीवन मिशनचा जनजागृती कार्यक्रम पार पडला. सदरील योजने साठी दिड कोटी रू.चा निधी मंजूर करण्यात आला.

यावेळी बोलताना मनोज जिंदाल म्हणाले की आरोग्यासाठी शुद्ध पाणी अत्यंत महत्त्वाचे असून जल जीवन मिशन अंतर्गत वखारी गावातील प्रत्येक घरासमोर शुद्ध पाण्याचे नळ उपलब्ध करून देण्यासाठी सदरील योजनेच्या माध्यमातून पिरकल्याण येथील धरणाचे पाणी वखारी गावापर्यंत आणले जाईल. त्यासाठी गावकऱ्यांनी सुद्धा आपल्या सहभागातून पुढाकार घेणे आवश्यक आहे.
दरम्यान स्वच्छतेविषयी गावात प्रभात फेरी काढण्यात आली, यामध्ये जिल्हा परिषद शाळा आणि संत ज्ञानेश्वर विद्यालय येथील विद्यार्थी, गावातील नागरिक, सहभागी झाले. त्यानंतर वखारी गावचा सामाजिक नकाशा काढून गावाची रूपरेषा सांगितली. जल जीवन मिशन विषयी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी यांनी पथनाट्य करून योजनेबद्दल जण जागृती केली. जल जीवन मिशन बद्दल प्रस्तवना राजे संभाजी सेवाभावी संस्थेचे प्रतिनिधी अरविंद येल्लम यांनी केली तर मनोगत चेअरमन काकासाहेब घुले यांनी केले.यावेळी बोलताना चेअरमन काकासाहेब घुले म्हणाले की मागील काही वर्षापासून पावसाच्या कमीअधिक प्रमाणामुळे दरवर्षी एप्रिल ते जून या कालावधीमध्ये गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या जाणवत आहे. सदरील योजने मुळे पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न मार्गी लागणार आहे.
सदरील कार्यक्रमा मध्ये उपमुख्यकार्यकारी अधिकारी अनुपमा नंदनवनकर, कार्यकारी अभियंता डाकोरे, उप कार्यकारी अभियंता मैद्रे, श्री.पालकर, शाखा अभियंता दाभाडे,पं. स. BDO कुलकर्णी, विस्तार अधिकारी सूर्यवंशी, ग्रामसेवक ठाकरे मॅडम, मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यासाठी राजे संभाजी सेवाभावी संस्थेचे प्रतिनिधी अरविंद येलम(सचिव ), रामेश्वर सोनुने (समाज शास्त्रज्ञ)
वखारी गावातील सरपंच सत्यभामा घुले, उपसरपंच संदीप बोरुडे, काकासाहेब घुले, आणि गावातील सर्व नागरिक इत्यादीनी सहभाग घेतला. कार्यक्रमचे संचालन पवार सर जि.प. शाळा मुख्यध्यापक यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन इंगोले मॅडम शिक्षिका जि. प. शाळा यांनी केले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *