ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected]com या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

शिक्षक समिती सावंतवाडीच्या वतीने शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा घरोघरी जाऊन गौरव

January 11, 202212:11 PM 41 0 0

सावंतवाडी (स्वाती पाटील)  : बांदा दि.९/०१/२०२२ महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा सावंतवाडी यांच्या वतीने नुकत्याच जाहीर झालेल्या पाचवी व आठवी इयत्तेतील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा घरोघरी जाऊन गौरव करण्यात आला. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने नेहमीच विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध परीक्षांचा निकाल जाहिर झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात येते.

महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद पुणे यांच्या वतीने ऑगस्ट २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर या परीक्षेत प्रावीण्य मिळवलेल्या शिक्षकांच्या पाल्यांचा गौरव घरोघरी भेट देऊन शिक्षक समितीच्या वतीने करण्यात आला .
या उपक्रमात शिक्षक समितीच्या सदस्य व महिला आघाडी यांनी सहभाग घेतला यावेळी अॅबॅकस स्पर्धेत सुयश मिळवलेले विद्यार्थी तसेच नवोपक्रम स्पर्धेतील यशस्वी शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. या भेटीवेळी शिक्षक समितीचे शिलेदार उपस्थित होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *