ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

प्रजासत्ताक दिनी सत्यशोधक पद्धतीने कोळकी फलटण येथे विवाह संपन्न

January 28, 202214:23 PM 83 0 0

राष्ट्रपिता महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या “सत्यशोधक विवाह” पद्धतीने त्या काळात मनू संस्कृतीला फाटा देऊन विवाह केले जात होते. त्याचप्रमाणे बहुजन समाजातील महापुरुषांचे विचार घेऊन राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांचे क्रांतिकारी गुरु वस्ताद लहुजी साळवे यांच्या विचारांनी प्रभावित होऊन मातंग समाजातील वधूपिता धनंजय कांबळे रा. ढाकणे ता. फलटण यांची कन्या अश्विनी व वरपिता शामराव खवळे रा.शिंदी ता माण यांचे चिरंजीव विशाल यांचा विवाह 26 जानेवारी चे औचित्य साधून विवाह संपन्न झाला.

हा सत्यशोधक पध्दतीचा विवाह ग्रामपंचायत कोळकी, फलटण. येथील फुले शाहू आंबेडकर सामाजिक सभागृह येथे पार पडला. यावेळी धान्याची नासाडी होऊ नये म्हणून सुगंधी फुलांचा अक्षदा म्हणून वापर करण्यात आला. सदर विवाहास माण फलटण दौंड बारामती मुंबई येथील मान्यवर उपस्थित होते

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *