ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

क्रांती दिनी जालन्यात कॉग्रेस पक्षाने दिला मोदी सरकार चले जाओचा नारा; मशाल रॅलीने वेधले जालनेकरांचे लक्ष

August 10, 202113:22 PM 62 0 0

जालना (प्रतिनिधी) ः दि. 9 ऑगस्ट क्रांती दिवस हा भारताच्या स्वातंत्र्यासाठी अनेक विरांनी बलीदान दिलेला दिवस आहे. या दिवसापासूनच स्वातंत्र्य आंदोलन उभे राहून इंग्रजांना चले जाओची हाक देण्यात आली होती. काँग्रेस पक्षाने या दिवशी मोदी सरकार चले जाओची घोषणा करून जालना शहरात मशाल रॅलीद्वारे केंद्र सरकार विरूध्द जोरदार घोषणाबाजी केली. जालना जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने क्रांती दिनानिमित्त आज सोमवारी महात्मा गांधी पुतळा गांधी चमन येथून मशाल रॅलीची सुरूवात केली. या प्रसंगी आ. कैलास गोरंट्याल, जालना जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, आ. राजेश राठोड यांनी बोलतांना सांगीतले की, देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्ष हा अग्रेसर होता. हजारो स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या जीवाचे बलीदान दिलेले असून त्यामुळेच 9 ऑगस्ट हा दिवस देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महत्वाचा ठरलेला आहे. 

जालना शहर कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख महेमूद यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना सांगीतले की, महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. नानाभाऊ पटोले यांनी राज्यभर 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट पर्यंत कार्यक्रम राबविण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यानुषंगाने आज सोमवार रोजी क्रांती दिनानिमित्त मशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. दि.16 ऑगस्ट रोजी औरंगाबाद येथे कॉग्रेस पक्षाची विभागीय बैठक कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या उपस्थितीत घेण्यात येणार असल्याचे शेख महेमूद यांनी सांगीतले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास आ. कैलास गोरंट्याल यांनी पुष्पहार अर्पण करून मशाल रॅलीची सुरूवात केली. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र राख, अ.भा.का. सदस्य भिमराव डोंगरे, माजी जिल्हाध्यक्ष आर.आर. खडके, प्रदेश सरचिटणीस कल्याण दळे, प्रा. सत्संग मुंढे, विजय कामड, गटनेते गणेश राऊत, युवानेते अक्षय गोरंट्याल, महिला कॉग्रेसच्या अध्यक्षा विमलताई आगलावे, राम सावंत, तालुकाध्यक्ष वसंत जाधव, बाबुराव सतकर, एकबाल कुरेशी, नवाब डांगे, डॉ. विशाल धानूरे, चंद्रकांत रत्नपारखे आदि प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

सदरील मशाल रॅली गांधी चमन येथून डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा मार्गे मस्तगड, मंमादेवी येथील स्वातंत्र्य सैनिक स्तंभाजवळ येवून त्या ठिकाणी शहिद स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या रॅलीमध्ये तालुकाध्यक्ष विठ्ठलसिंग राणा, लक्ष्मण मसलेकर, निळकंठ वायाळ, अशोक उबाळे, नगरसेवक संजय भगत, जगदिश भरतीया, शेख शकील, रमेश गौरक्षक, बालकृष्ण केोताकोंडा, विनोद रत्नपारखे, अरूण मगरे, सय्यद अजहर, महावीर ढक्का, आनंद लोखंडे, गुरमितसिंग सेना, शेख शमशू, शहराध्यक्षा शितलताई तनपुरे, नंदाताई पवार, मंगलताई खांडेभराड, चंदाताई भागडीया, मथुराबाई सोळंके, मंदा पवार, सय्यद करीम बिल्डर, अरूण घडलींग, सोपान तिरूखे, अंजेभाऊ चव्हाण, गजानन खरात, शेख शाहेद, सय्यद रहिम तांबोळी, शिवाजी वाघ, मनोहर उघडे, अजीम बागवान, शेख वसीम, जावेद बेग, कृष्णा पडोळ, गणेश खरात, भाऊसाहेब सिरसाठ, बाबासाहेब सोनवणे, नारायण वाढेकर, गौतम लांडगे, राहुल रत्नपारखे, अन्सार कुरेशी, अनिकेत चांदोडे, विकी घुमारे, शेख सरफराज आदि पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *