ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

जागतिक महिला दिनानिमित्त भारतरत्न स्वर्गीय लतादीदी यांना आदर्श महिला मंडळात महिलांकडून अनोखी स्वर पुष्पांजली

March 13, 202212:09 PM 49 0 0

पनवेल (छाया म्हात्रे )  :  ८ मार्च हा जागतिक महिला दिन हा अवघ्या जगात महिलांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ जागतिक दिन साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून साधारणपणे सर्वत्र जवळ जवळ आठ दिवसांपर्यंत महिलांच्या सन्मानासाठी वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून सर्वच क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या महिलांचे सन्मानचिन्ह देऊन तसेच प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान केले जाते. आपल्या भारत देशाची शान व मान आणि अनमोल रत्न, भारतरत्न स्वर्गीय लतादीदी. ज्यांच्या डोक्यावर अर्थातच गळ्यात साक्षात सरस्वती देवीचे वरदान लाभलेले आहे. ज्यांची स्वरांवर हुकूमत चालत होती. सा रे ग म प ध नी सा म्हणजे स्वरसम्राज्ञी लतादिदी. कुहुकुहु गाणारी कोकिळेचे स्वर जिथे फिके पडतील अशी साक्षात मुर्तीमंत गानकोकिळा लतादीदी यांच्या पुण्यस्मरणार्थ अवघ्या देशभर महिला दिना निमित्त दीदींची गाणी आणि त्यांच्याच गाण्यांवर नृत्याचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून हा दिवस साजरा करण्यात आला. लतादीदी एक महान जगप्रसिध्द महिला. हे अलौकिक दिव्य स्वर पुन्हा उमटणार नाहीत आणि पुन्हा जन्मणार नाही.
महिला मंडळ म्हटलं की जिथे फक्त महिलांचेच राज्य. शुक्रवार दिनांक ११ मार्च रोजी पनवेल येथील मिडल क्लास सोसायटीतील आदर्श महिला मंडळात जागतिक दिनाचे औचित्य साधून स्वरसम्राज्ञी भारतरत्न स्वर्गीय लतादीदी यांच्या स्मरणार्थ त्यांनी गायलेली गाणी आणि त्यांनी गायलेल्या गाण्यांच्या तालावर नृत्य असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गाणी गाण्यास महिलांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच सौ. छाया म्हात्रे यांनी दीदींच्या गाण्यांविषयी आणि महिला दिन विशेष माहिती सादर केली. आणि सौ सुमन खैरे यांनी “तुझं मागतो मी आता गजानना” हे ईशस्तवन गाऊन बाप्पाची आराधना करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. “मेरी आवाज ही पहचान है” असं म्हणत सौ. सुमेधा गुरुजी यांनी लता दिदिं विषयी माहिती दिली आणि अश्विनी खेडकर यांनी दीदींच्या आठवणी जागविल्या. त्यानंतर सौ. वर्षा वाणी म्हणजे हे सदाबहार व अवखळ व्यक्तिमत्व. त्यांनी बहारदार नृत्य सादर केले. तसेच ज्येष्ठ भगिनी प्रतिभा दळवी, संध्या दांडेकर, मंदा म्हात्रे, संगीता सावंत, संध्या कुलकर्णी, रंजना पाटील, निकी जोशी आणि माधुरी जोशी यांनी हिंदी व मराठी गाणी गायली. आमची सखी सौ. पुष्पा पाटील कार्यक्रमास उपस्थित राहिली त्यामुळे कार्यक्रमाची शोभा वाढली. छोटी मायरा वय वर्षे चार हीने बालगीत गाऊन कार्यक्रमास रंगत आणली. आपल्या मृदू आवाजात छाया म्हात्रे ह्यांनी “पंख होती तो उड आती रे रसिया ओ जालीमा” हे सेहरा या चित्रपटातील दीदींचे सुरेल गाणं गाऊन सर्वांना जुन्या काळातील अभिनेत्री संध्या आणि मुमताज ह्यांची आठवण करून दिली. त्यानंतर बहारदार समूह नृत्य सादर करण्यात आले. त्यात जयश्री गुडेकर, संगीता सावंत, अलका व हेमलता या सर्वांनी भाग घेतला होता. आणि या नृत्यात ८ वर्षाच्या शौर्य जोशी याने बाळकृष्णाची भूमिका पार पाडली.
कार्यक्रमाची आगळी-वेगळी ओळख म्हणजे ठसकेदार, खुमासदार शब्दांचे सूत्रसंचालन म्हणजे छाया म्हात्रे यांची आगळी वेगळी भेट. त्यास उपस्थित महिला हसत-हसत दाद देत होत्या. त्यामुळे उत्तम मनोरंजन होत होते. त्यामुळे कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला. आलेल्या उपस्थित महिलांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. तसेच सर्वांची खान पाण्याची उत्तम सोय केली होती. कार्यक्रमाच्या शेवटी “अखेरचा हा तुला दंडवत” म्हणत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. भारतरत्न स्वर्गीय लतादीदी यांना पनवेल मधील आदर्श महिला मंडळा तर्फे अनोखी स्वर पुष्पांजली अर्पण करण्यात आली.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *