दिनांक 8 मार्च 2019 रोजी जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सारवाडी येथे ग्रामपंचायत मध्ये निवडून आलेल्या महिला ग्रामपंचायत सदस्य कर्तबगार महिला या आपल्या संसाराचा गाडा हाकत राजकीय जबाबदारी सांभाळत असल्यामुळे त्यांचा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सारवाडी यांच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून त्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. सर्वप्रथम राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस सारवाडी येथील महिला सरपंच सौ निलावाती जनार्दन काळे आणि उपसरपंच सौ सरला कैलास काळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच समस्त उपस्थित महिला यांनी देखील अभिवादन केले.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती गायकवाड यांनी उपस्थित सर्व ग्रामपंचायत सदस्य यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत करून त्यांना जागतिक महिला दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या.तसेच शिक्षिका जनाबाई भोंबे यांनी उपस्थित महिला ग्रामपंचायत सदस्य यांना शाळेच्या बाबतीत सुरू असलेले उपक्रम आणि ऑनलाइन शिक्षण याबाबत माहिती देऊन थोडक्यात आढावा दिला. यावेळी उपस्थित महिला ग्रामपंचायत सदस्य सरपंच आणि उपसरपंच यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि सर्वांना महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी महिला सरपंच निलावती जनार्दन काळे उपसरपंच सरला कैलास काळे सदस्य कौसल्या दामोदर काळे सदस्य सखुबाई अंकुशराव काळे ऐश्वर्या दामोदर काळे सदस्य शालेय पोषण आहार कार्यकर्त्या विमलबाई भीमराव काळे शालेय पोषण आहार मदतनीस सौ सुशीला दत्तात्रय काळे आशा कार्यकर्ती सौ मंदा कैलास काळे, अंगणवाडी मदतनीस छायाबाई बबन निंबाळकर, आरोग्य कर्मचारी डॉक्टर व्हि जी जावळे, आरोग्य सेविका श्रीमती व्ही.व्ही. सोनवणे तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सारवाडी येथील ज्येष्ठ प्राथमिक पदवीधर शिक्षक ज्ञानेश्वर गिराम, शिक्षिका श्रीमती जनाबाई भोंबे,आशा कार्यकर्ती मंदा कैलास काळे, मुख्याध्यापिका विश्वलता गायकवाड तसेच युवा कार्यकर्ते सिद्धार्थ नरवडे शालेय पोषण आहार कार्यकर्ती विमल भीमराव काळे, मदतनिस सुशीला दत्तात्रय काळे हे उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. गायत्री कैलास काळे आणि नंदिनी कैलास काळे यांनी केले तर आभार प्रदर्शन पदवीधर शिक्षक ज्ञानेश्वर गिराम यांनी मानले.
Leave a Reply