ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

मदर्स डे च्या निमीत्ताने !

May 11, 202119:49 PM 36 0 0

आज सकाळी फोन हातात घेऊन व्हाट्सअप पाहिले तर बरेच मेसेज हे “हॅप्पी मदर्स डे” चे होते. ते पाहिले व प्रश्न पडला की आईचे प्रेम, त्याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही. तिच्याविषयी आदर, कृतज्ञता म्हणून फक्त एक दिवस पुरेसा आहे का? “मातृ देवो भव: पितृ देवो भव” म्हणणारी आमची संस्कृती, रोज आई-वडिलांना देवाबरोबर आम्ही नमस्कार करूनच घरातून बाहेर पडतो. आई म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील त्याची जडणघडण करणारी. काहीही झाले तरी आमचे हट्ट पुरविणारी व कुठल्याही प्रसंगी आमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहून आम्हाला नित्य आत्मविश्वास देणारी व्यक्ती.

तिच्या आयुष्यातील कित्येक वर्ष ही फक्त आमच्यासाठीच गेलेले असतात. आम्हाला आम्ही आहोत असे स्वीकारणारी म्हणजे फक्त आई तिची उतराई करण्यासाठी फक्त एक दिवस देऊन कसा चालेल. सण उत्सवांची परंपरा असलेली आमची संस्कृती,  सर्वांना पूजनीय मानणारी आमची संस्कृती, पण नकळत आज आमची पिढी ही हया “डे” संस्कृतीकडे वळलेली दिसते असे वाटते. मग आम्ही विविध “डे” साजरे करतो पण आमचे प्रेम व भावनाही त्या फक्त “डे” पुरत्याच मर्यादित राहतात व नकळत आम्ही आमच्या पुढच्या पिढीच्या भावना ही कुठेतरी मर्यादित करत आहोत. आईचे प्रेम व त्या विषयीची कृतज्ञता अशी एका दिवसात कशी बरे व्यक्त करता येईल. एका दिवसापुरती मर्यादित कशी करता येईल?

 

डॉ. पी. एस. महाजन, संभाजीनगर

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *