ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न

August 30, 202217:26 PM 12 0 0

उरण (संगीता ढेरे) : हॉकीच्या खेळातील जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो त्याच अनुषंगाने राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रायगड अलिबाग, नेहरू युवा केंद्र, रायगड व प्रिझम सामाजिक विकास संस्था, अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली वरसोली येथील समुद्रकिनाऱ्यावर जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेमध्ये 100 मीटर धावणे 800 मीटर धावणे गोळा फेक लांब उडी आधी विविध स्पर्धांचा समावेश करण्यात आला होता यावेळी या स्पर्धेच्या उद्घाटनास ज्येष्ठ विधीतज्ञ अॅड. डॉ. निहा अनिस राऊत, अॅड.कला ताई पाटील- सेन्टेनियस लायन्स क्लब ऑफ श्रीबाग प्रेसिडेंट, निशांत रौतेला- जिल्हा युवा समन्वयक नेहरू युवा केंद्र, रायगड- अलिबाग, अंकिता मयेकर तालुका क्रीडा अधिकारी, तपस्वी गोंधळी- राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी तथा अध्यक्षा प्रिझम सामाजिक विकास संस्था अलिबाग, सुचिता साळवी – अध्यक्षा स्वयंसिध्दा सामाजिक विकास संस्था, रोहा तथा संचालिका स्पर्धा विश्व अकॅडमी, अलिबाग आदी मान्यवर उपस्थित होते.

या स्पर्धेत युवक- युवतींने उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला व सर्व विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *