ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

नवरात्रौत्सव निमित्त पूजेचे साहित्य खरेदीसाठी महिलावर्गाची लगबग सुरु नवरात्र उत्सवासाठी बाजारपेठ सजल्या

October 7, 202115:39 PM 25 0 0

उरण ( संगिता पवार ) गुरुवारपासून सुरु होणाऱ्या नवशक्तीच्या उत्सवाचे स्वागत करण्यासाठी उरण शहरातील बाजारपेठही सजली आहे. नवरात्र काळात लागणारे विविध साहित्य बाजारपेठेत विक्रीसाठी आले असून पूजेच्या खरेदी करण्यासाठी महिलांची साहित्याच्या खरेदी साठी लगबग सुरू झाली आहे. . कोरोनामुळे वाढलेल्या महागाईचा मातीच्या घटाबरोबरच देवीच्या फटका नवरात्र उत्सवाला सुद्धा प्रतिकात्मक मूर्तीचीदेखील बसला असून गेल्या वर्षी पेक्षा या प्रतिष्ठापना करतात.


हा उत्सव गुरुवार पासून सुरु होत असल्याने बाजारपेठेत उत्सवासाठी लागणारे विविध साहित्य खरेदी करण्यासाठी गर्दी होत आहे. यामध्ये घटस्थापनेसाठी आवश्यक असणारी मडकी, घट, मुकुट, फैटे, दागदागिने, मंदिर, तोरण, झालर, परडी, नाडा, आकर्षक झुंबर असे विविध साहित्य खरेदी करण्यास महिलांचे प्राधान्य आहे. पितृपंधरवडा झाल्यानंतर नवरात्रोत्सव साजरा करण्यात येतो. दि. ७ ते दि. १५ या कालावधीत यावर्षी नवरात्रोत्सव साजरा करण्यात येणार आहे. गणेशोत्सवात घरोघरी गणेश मूर्ती बसवितात. मात्र नवरात्रोत्सवात मात्र फक्त सार्वजनिक मंडळे दुर्गा मातेची प्रतिष्ठापना करतात.
घट स्थापना करण्यासाठी लागणाऱ्या वस्तू विक्री करण्यासाठी उरण बाजारात विक्रेत्यांनी गर्दी केली आहे. देवीच्या घटासाठी विधिवत पूजेसाठी लागणारे खण-साडी, बांगडीओटी तसेच घटाच्या पूजेसाठी पत्रावळीही बाजारात विक्रीसाठी दाखल झाली आहे. यामध्ये लहान मोठी अशा दोन प्रकारची पत्रावळी आहे. तसेच पाच फळे यामध्ये कोट, कवडा, सीताफळ, बेलफूल, पेरू याचा समावेश आहे.
देवीसाठी लागणाऱ्या साहित्यांच्या किमती देवीसाठी लागणारा घट ( गरबा ) नक्षीकाम केलेले ३०० रुपयास एक अश्या भावाने विकतो असे
लीलाबाई वाघरी यांनी सांगितले . तर लाल घट बाजारात .७० रुपयाला मिळत आहे, तर काळा घट ४० रुपयापर्यंत किमत आहे. त्यासाठी लागणारी परडी ५० रुपयालामिळत आहे. पूजेसाठी लागणारे लाल कापड ६० रुपयाला आहे. तसेच हळद, कुंकू, कापूर, अगरबत्ती गुलाल, धूपकांडी ही बाजारात उपलब्ध आहे. मंदिरामध्ये देवीपुढे दिवा लावण्यासाठी वाती १५ रुपयाला आहेत. नारळ २० ते ३५ रुपयाला आहे. मोठी परडी १५० ते २०० रुपयाला आहे. तर मंडपी ४०रुपयाला आहे. देवीचे गार पाकीट ४० ते ८० रुपये, तसेव देवीच्या पूजेसाठी लागणारी लोभागदाणी, ऊददाणीही बाजारात आल्या आहेत. एक घट बसविण्यासाठी घटारवठी लागणारी काळी माती २० रुपयाला मिळत आहे. अशी माहिती विक्रेत्यांनी दिली .

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *