ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

शिवसेना वर्धापनदिनानिमित्त जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकरांकडून कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या कुटूंबियांना मदतीचा हात

June 20, 202112:52 PM 55 0 0

बदनापूर, दि. १९ (सा.वा.)-शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांनी जिल्हा शिवसेनेच्या वतीने जिल्ह्यातील कोरोनाने मृत्यू पावलेल्या कुटुंबप्रमुखांच्या कुटुंबियांना मदतीचा उपक्रम हाती घेतला असून जालना तालुक्यानंतर दुसNया टप्प्यात आज १९ जुन रोजी बदनापूर तालुक्यातील कुटुंबियांना बियाणे व रोख रक्कमेच्या स्वरूपात माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर, माजी आमदार संतोष सांबरे, भानुदास घुगे यांच्या हस्ते मदतीचे वाटप करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर उपजिल्हाप्रमुख पंडीत भुतेकर,भगवान कदम, जि.प. सदस्य कैलास चव्हाण, गणेश डोळस,सभापती बी.टी. शिंदे, भरत सांबरे, रवि बोचरे, अरुण डोळसे, किसन खांडेकर, भरत मदन, श्रीराम कान्हेरे, राजु जNहाड यांची प्रमुख उपस्थिती होती. या अत्यंत भावनिक अशा कार्यक्रमात बोलतांना माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर म्हणाले की, रंजल्या-गांजल्यासाठी सामाजिक भावनेने काम करणारे नेतृत्व शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर हे आहेत. कोविडमुळे दुर्दैवाने जिल्ह्यात अनेक कुटूंबिप्रमुखांचे निधन झाले. कुटुंबांचा प्रमुखच गेल्याने त्यांचा आधार गेला. अशा कुटूंबियांना मदत करण्याचा अनोखा उपक्रम शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांनी राज्यात प्रथमच राबवला.अत्यंत संवेदनशील मन व सामाजिक भान असणारे जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर हे जिल्ह्यात जालना आणि आता बदनापूर तालुक्यातील कुटुंबाचा आधार गेलेल्या शेतकरी कुटुंबांना खत, बी-बियाणे यासाठी मदतीचा हात पुढे करणारा उपक्रम राबवित आहेत. कोरोनाच्या पाश्र्वभुमीवर जिल्हाप्रमुख अंबेकरांनी भाजीपाला वाटप,अन्नधान्य वाटप, अन्न वाटप, अन्नछत्रच्या माध्यमातून इतर राज्यात व जिल्ह्यात जाणाNया वाटसुरुंसाठी जेवनाची व्यवस्था, कोरोना योद्ध्यांना भेटवस्तू देऊन त्यांचे ऋण व्यक्त करणे, मास्क वाटप, असे अनेक सामाजिक उपक्रम राबवून नागरिकांना दिलासा दिला. तर यापुर्वी जिल्हाप्रमुख झाल्यापासून उत्तराखंड येथील शहीद सैनिकांच्या कुटुंबियांना, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदत, अत्यंत तीव्र पाणी टंचाईच्या काळात ग्रामीण भागात मुकाबला दुष्काळाचा मोहीम राबवून पिण्यासाठी पाणी उपलब्ध करुन दिले. असे अनेक उपक्रम कुठल्याही राजकीय लालसेतून नव्हे तर सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून ते सातत्याने राबवित असतात. असेही ते म्हणाले. पुढे बोलतांना खोतकर म्हणाले की, शिवसेना जिल्हाप्रमुख श्री.भास्करराव अंबेकर यांनी जात-पात, धर्म व राजकारणाच्या पलीकडे जाऊन काम केले व सर्व समाज घटकांचा विचार करून उपक्रम राबविले. सद्यस्थितीमध्ये स्वतःचा उदो…उदो करणारे, वाढदिवसानिमित्त स्वतःचेच होर्डिंग लावणारे पदाधिकारी भरपूर दिसतील पण तळमळीने समाजासाठी काम करणारा जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांच्या सारखा पदाधिकारी विरळाच असल्याचे माजीमंत्री अर्जुनराव खोतकर म्हणाले. समाजाचे देणं लागतो या भुमिकेतून काम – जिल्हाप्रमुख अंबेकर कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात आपले मनोगत व्यक्त करताना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर म्हणाले की, जिल्ह्यात कोविडने अनेक संसार अडचणीत आले, सामाजिक प्रश्न निर्माण झाले, कुटुंब निराधार झाले, लहान मुले उघड्यावर आली त्यांना आर्थिकच नव्हे तर भावनिक आधाराची गरज होती. अशा कुटुंबीयांसाठी काहीतरी केले पाहिजे या भावनेतून हा उपक्रम सुरू केला. जालना येथे ५१ आणि आज बदनापूर तालुक्यातील जवळपास ५१ कुटुंबांना बि-बियाणे व नगदी स्वरुपात मदत केली. मी काही आर्थिकदृष्ट्या सक्षम असणारा पुढारी नाही. परंतु पक्षाने दिलेला चेहरा व सर्वसामान्यांनी दिलेले नाव. त्यामुळे समाजाचं देणं लागतो या भावनेतून आपण सतत काम करत असतो व यातूनच आपणास प्रेरणा मिळते. कुटुंबातील कर्ताच गेल्याने त्यांनी खचून जाऊ नये तर आपल्या चिमुकल्यांसाठी पुन्हा हिंमतीने उभे राहण्याचे आवाहन करतांनाच शिवसेना सदैव आपल्या पाठीशी असल्याचे त्यांनी सांगितले. माजी आमदार संतोष सांबरे यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांनी कोविड महामारी आजाराने आधार गमावलेल्या बदनापूर तालुक्यातील कुटूंबियांना मदतीचा हात पुढे करुन त्यांना दिलासा दिला. त्याबद्दल आभार व्यक्त केले व जिल्हाप्रमुख अंबेकर हे सातत्याने सुख-दुःखात जिल्ह्यातील जनतेच्या पाठीशी ठामपणे उभे असतात, असे म्हणाले. तर किसान सेनेचे भानुदास घुगे यांनीही आपले मनोगत व्यक्त करतांना जिल्हाप्रमुख अंबेकर यांचे कौतुक करुन धन्यवाद दिले. यावेळी छायाताई जNहाड, पुजा टेहरे, कैलास खैरे, सुनिल बनकर, मच्छीद्र होळकर, परमेश्वर मात्रे, किशोर क्षिरसागर, बळीराम मोरे, दत्ता जगताप, संभाजी अवघड, संतोष नागवे, बालाजी गारखेडे, महादू गिते, अंबादास कोळसकर, सुभाष आडसूळ, कल्याण डाके, गोरख लांबे, अंकुश वाघ, गजानन बोंद्रे, वैजीनाथ सिरसाट, लिंबाजी क्षिरसागर, सुदाम काळे, रवि मदन, किशोर मदन, अनिल हिवराळे, भरत गारखेडे, कृष्णा कोल्हे, बळीराम कोल्हे, अशोक चव्हाण, ऋषी थोरात यांच्यासह शेकडो शिवसैनिकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन उपजिल्हाप्रमुख भगवान कदम यांनी केले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *