ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

एकदा मेणबत्ती ऐवजी..बलात्कारी पेटवला तर..??

September 24, 202113:20 PM 80 0 1

काय अवस्था होत असेल..त्या नाजूक शरीराची..
एक आर्त किंचाळी घुमते..त्या नाजूक जीवाची..
छाटले जातात जणू.. एका पाखराचे पर..
एकदा मेणबत्ती ऐवजी..बलात्कारी पेटवला तर..??

कस जगायच तिने सांगा..कस फिरायचं बिनधास्त..
पवित्र नजरे पेक्षा..इथ वासनिक नजरा जास्त..
खुलेआम उडवली जाते..भररस्त्यात तिची टर..
एकदा मेणबत्ती ऐवजी..बलात्कारी पेटवला तर..??

अहो महिलाच काय तर..कोवळ्या मुली सोडत नाही..
सुख हवं असत तात्पुरत..काही फरक पडत नाही..
आकांत करतो तो जीव..लचके तोडतात हैवान नर..
एकदा मेणबत्ती ऐवजी..बलात्कारी पेटवला तर..??

नरकयातना कुणाकुणाला..भोगाव्या लागल्या फार..
बलात्कार करून नंतर..नाजूक अवयवावर केले वार..
कोणी मदतीला नाही येत..नाही पोचत लवकर..
एकदा मेणबत्ती ऐवजी..बलात्कारी पेटवला तर..??

कायदा महान आहेच की..पण होतो खूप उशीर..
पाहू शकत नाही कुटुंब..ठेऊ शकत नाही धीर..
त्वरित फाशी व्हावी बस..मन म्हणत चौरंगा कर..
एकदा मेणबत्ती ऐवजी..बलात्कारी पेटवला तर..??

माझ्या शिवबा च्या राज्यात..सुखी होती प्रजा..
स्त्रिया ही समाधानी..कारण छत्रपती होते राजा..
हातपाय कलम व्हायचे..अशी घटना घडली जर..
एकदा मेणबत्ती ऐवजी..बलात्कारी पेटवला तर..??

मन व्याकुळ होत हो..काही करू शकत नाही आपण..
फक्त निषेध करू शकतो..मिळून सर्वजण..
विनंती न्याय व्यवस्थेला..न्याय पटकन द्या कधीतर..
एकदा मेणबत्ती ऐवजी..बलात्कारी पेटवले तर..??

अमोल थिटे,माढा, जि. सोलापूर

Categories: कविता, साहित्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *