जालना ( प्रतिनिधी) : मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा निमीत्ताने महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ मुंबई आणि मराठवाडा साहित्य परिषद जालना शाखेच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी ( ता. २६) प्रजासत्ताक दिनी सायंकाळी ६. वा.जुना जालना भागातील राष्ट्रवादी भवन सभागृहात एकांकिका व कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती मसापचे अध्यक्ष प्रा. रमेश भुतेकर व सचिव पंडितराव तडेगांवकर यांनी दिली.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने सध्या मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा साजरा केला जात आहे.यातच खारीचा वाटा म्हणून मराठी भाषा, साहित्य व संस्कृती च्या संवर्धनासाठी अविरत प्रयत्नशील असलेल्या मसाप जालना शाखेच्या वतीने या देखण्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. राजेंद्र राख यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार असून अध्यक्ष स्थानी जेष्ठ नेते आर. आर. खडके हे राहतील. सतीश लिंगडे निर्मीत, सुमीत शर्मा दिग्दर्शीत ‘ रंग ‘ ही एकांकिका सादर होईल. या नंतर जिल्ह्यातील भुमीपुञांचे निमंत्रित कविसंमेलन होणार आहे. तरी या सोहळ्यास साहित्य व सांस्कृतिक रसिकांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन मसाप चे अध्यक्ष प्रा. रमेश भुतेकर, सचिव पंडितराव तडेगांवकर यांच्यासह मसाप च्या वतीने करण्यात आले आहे.
Leave a Reply