ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

महिला व बाल विकास विभागातंर्गत एक दिवसीय कार्यशाळा संपन्न

December 10, 202113:05 PM 68 0 0

जालना   :- कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासुन संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम- 2013 च्या 8 व्या वर्धापन दिनानिमीत्ताने जिल्हा महिला व बाल विकास विभाग कार्यालय, जालना यांच्यावतीने एक दिवसीय कार्यशाळेचे जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजन करण्यात आले होते.

व्यासपीठावर निवासी जिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) तथा जिल्हा‍ अधिकारी, स्थानिक तक्रार समितीच्या अध्यक्षा श्रीमती अंजली कानडे, वरिष्ठ स्तर न्यायाधीश श्रीमती एच.अन्सारी,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना क्षीरसागर, जिल्हा कार्यक्रम अधिकारी एस.डी. लोंढे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्रीमती आर.एन. चिमंद्रे, स्थानिक तक्रार समितीच्या अध्यक्षा श्रीमती अश्विनी धन्नावत, प्रा. रेणुका भावसार, ॲड कल्पना त्रिभुवन, ॲड पी.जे. गवारे आदींची उपस्थिती होती.
कार्यशाळेच्या प्रास्ताविकात जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीमती आर. एन. चिमंद्रे यांनी अधिनियम 2013 बाबत माहिती देत ज्या शासकीय, निमाशासकीय, ,खाजगी आस्थापनेमध्ये 10 किंवा 10 पेक्षा अधिक कर्मचारी असतील त्यांनी कार्यालयात अंतर्गत तक्रार समिती गठीत करावी व ज्या आस्थापनेमध्ये 10 पेक्षा कमी कर्मचारी असतील त्यांनी जिल्हास्तरीय स्थानिक तक्रार समितीकडे कामाच्या ठिकाणी लैंगिक छळाची तक्रार करण्याचे आवाहन केले. कार्यशाळेत प्रमुख वक्त्या प्रा. रेणुका भावसार यांनी कायद्याची पार्श्वभुमी व महिलांची सामाजिक सुरक्षितता या विषयावर मार्गदर्शन केले तर ॲङ कल्पना त्रिभुवन यांनी कायद्याची माहिती दिली. ॲङ पी. जे. गवारे यांनी अंतर्गत समिती मधील अनुभव तसेच चित्रफित दाखवून कायद्याची माहिती दिली.
श्रीमती पुष्पा कापसे यांनी सुत्रसंचालन केले व गजानन इंगळे यांनी आभार मानले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी श्री. कनगरे, एम.ए. पाटील,श्री करंबे, श्री कुलकर्णी, के. एस. नेरे, श्रीमती योगीता चव्हाण,सचिन चव्हाण, विनोद दाभाडे, सातपुते, श्रीमती चव्हाण आदींनी परिश्रम घेतले. कार्यशाळेस जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय, खाजगी कार्यालयातील अंतर्गत तक्रार समितीमधील अध्यक्ष व सदस्य उपस्थित होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *