नांदेड प्रतिनिधी (रूचिरा बेटकर) -तामसा येथे बीएसएनएल कार्यालयातील एक लाख रुपये किंमतीच्या बॅटऱ्या चोरण्यात आल्या आहेत. तसेच कासराळी शिवारातून एक लाख 16 हजार रुपये किंमतीच्या दोन म्हशी चोरुन नेण्यात आल्या आहेत.
बीएसएनएलमधील कर्मचारी हणमंत केरबा कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 18 ऑगस्टच्या सायंकाळी 5.30 ते 19 ऑगस्टच्या पहाटे दरम्यान त्यांनी बीएसएनएल कार्यालय तामसा येथे कुलूप लावून आपल्या घरी गेले. दुसऱ्या दिवशी ड्युटी करण्यास आले असतांना कार्यालयाचे कुलूप तुटलेले होते. आतील 20 बॅटरी सेल, किंमत 1 लाख रुपयांचे कोणी तरी अज्ञात चोरट्यांनी त्यातून चोरून नेले आहे. या तक्रारीवरून तामसा पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस उपनिरिक्षक घुगे हे करीत आहेत.
बालाजी गंगाधर निम्मलवाड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मौेजे कासराळी ता.बिलोली शिवारात दत्तात्रय उपलंचवार यांच्या शेतातील दोन म्हशी 19 ऑगस्टच्या सायंकाळी 6 ते 20 ऑगस्टच्या पहाटे 6 वाजेदरम्यान कोणी तरी चोरून नेल्या आहेत. या म्हशींची किंमत 1 लाख 16 हजार रुपये आहे. बिलोली पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार शिंदे अधिक तपास करीत आहेत.
Leave a Reply