ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

गवताच्या गंजीत होरपळून एकाचा होरपळून मृत्यू

February 24, 202214:25 PM 37 0 0

नाशिकः नाशिक जिल्ह्यातल्या वणी (ता. दिंडोरी) येथे गवताच्या गंजीला लागलेल्या आगीत  होरपळून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय. काल रात्री हा अपघात घडला. त्यात शेतात आग विझवण्यासाठी कसलिही सोय नव्हती. त्यामुळे हा बळी गेला. मनोहर पवार असे 54 वर्षीय मृताचे नाव असल्याचे समजते. या घटनेबद्दल पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये नाशिक जिल्ह्यात आग लागल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. नुकतीच नाशिकमधल्या एका कंपनीतही आग लागली होती. मात्र, या घटनेत कसलिही जीवित हानी झाली नाही. कंपनीतील सारे सामान जळून खाक झाले.
वणी येथील मनोहर पवार हे 23 फेब्रुवारी रोजी बुधवारी लक्ष्मी नगरातील शिवारातल्या शेतात होते. त्यावेळी शेतात रचून ठेवलेल्या गवताच्या गंजीला आग लागली. ही बातमी कळताच गावकऱ्यांसह वणीच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, गवताची गंजी वाळलेली होती. आगीचा भडका उडाला. बराच वेळ आगीचे तांडव सुरू होते. यावेळी आग विझवण्यासाठी अग्निशमन बंब आणि दुसऱ्या पाण्याचीही व्यवस्था नव्हती. या आगीत गवताची गंज पूर्णतः जळून खाक झाली. त्यातच पवार यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *