सुप्रिया कांबळे प्रतिनिधी (कराड-पाटण) : काकासाहेब चव्हाण महाविद्यालयात ऑनलाईन कार्यक्रम द्वारे शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे ३४ वा पुण्यस्मरण दिन साजरा तळमावले, ता. : येथील काकासाहेब चव्हाण महाविद्यालयात ऑनलाईन कार्यक्रम द्वारे शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे ३४ वा पुण्यस्मरण दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मा श्री ज्ञानेश्वर मुळे (सेवानिवृत्त वरिष्ठ राजदूत व सचिव परराष्ट्र मंत्रालय भारत सरकार ) उपस्थित होते त्यांनी बदलते शिक्षण व मूल्यव्यवस्था याविषयी मार्गदर्शन केले.
राज्यातील तळागाळातील सर्व सामान्य गोरगरीब लोकांपर्यंत ,खेडोपाडी डोंगर कपाडी ज्ञानाची गंगोत्री पोहचविणारे.आधुनिक काळातील भगिरथ,ज्ञानसुर्य,श्रेष्ठ गुरुवर्य दलितमित्र ,स्वातंत्र्य सेनानी म्हणुन शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे ओळखले जातात अशा कार्यक्रमला उपस्थित राहणे भाग्याचे असेही त्यांनी नमूद केले.
या ऑनलाईन कार्यक्रमासाठी, अध्यक्षस्थानीं मा प्राचार्य अभयकुमार साळुंखे (कार्याध्यक्ष,श्री स्वा.वि.शि.संस्था, कोल्हापूर ) , मा.प्राचार्य सौ शुभांगीताई गावडे (सचिवा,श्री स्वा.वि.शि.संस्था,
कोल्हापूर ), मा.प्राचार्य डॉ राजेंद्र शेजवळ ( सहसचिव प्रशासन , श्री स्वा.वि.शि.सं, कोल्हापूर ), मा प्राचार्य एम.एस गवळी ( सहसचिव अर्थ , श्री स्वा.वि.शि.सं.कोल्हापूर ) या नामवंत मंडळींबरोबर आजी माजी प्राचार्य, प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्यने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत – मा प्राचार्या सौ शुभांगीताई गावडे यांनी केले तर प्राचार्य एस.एम.गवळी यांनी मान्यवरांचे आभार मानले.
Leave a Reply