जालना ( प्रतिनिधी) : शिक्षक राजेंद्र शेळके लिखित ’ संस्काराचे मोती’ या पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी दि.3 दुपारी अडीच वाजता ऑनलाइन होणार आहे.
शहरातील भाग्यनगर परिसरातील जालना तालुका जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात मोजक्याच मान्यवर साहित्यिकांच्या उपस्थितीत प्रकाशन समारंभ आयोजित करण्यात आला आहे. ऑनलाइन प्रकाशन समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध कवयित्री डॉ.संजीवनी तडेगावकर या राहतील. कवी,पत्रकार डॉ.सुहास सदाव्रते यांच्या शुभहस्ते ’संस्काराचे मोती’ या राजेंद्र शेळके लिखित पुस्तकाचे प्रकाशन होईल. प्रसिद्ध बाल साहित्यिक डॉ.विशाल तायडे हे पुस्तकावर भाष्य करतील.कार्यक्रमास जेईएस महाविद्यालय मराठी विभागाचे प्रमुख डॉ.यशवंत सोनुने यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमास जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ.राजेंद्र कांबळे,
शिक्षणाधिकारी कैलास दातखीळ, शिक्षणाधिकारी आशा गरुड, उपशिक्षणाधिकारी नागेश मापारी, उपशिक्षणाधिकारी बाळासाहेब खरात, उपशिक्षणाधिकारी मंगल धुपे, प्रा. संजय येवते, गटशिक्षणाधिकारी गीता नाकाडे, बाबुराव पवार यांची ऑनलाइन प्रमुख उपस्थिती राहणार आहे. जिल्ह्यातील साहित्यिक प्रेमींनी ऑनलाइन पुस्तक प्रकाशन समारंभास झूम, यु ट्यूब, फेसबुक माध्यमातून सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद शिक्षक महामंडळ आणि निमंत्रक रमेश हुशे यांनी केले आहे.
Leave a Reply