ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

दि.22 डिसेंबर 2021 रोजी मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश रद्द

December 21, 202113:09 PM 46 0 0

जालना  :- राज्यातील नगरपंचायतीलमधील सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रत्यक्ष निवडणुक कार्यक्रम तसेच निधन, राजीनामा, अनर्हत किंवा इतर अन्य कारणामुळे ग्रामपंचायतीतील रिक्त झालेल्या पदांच्या पोट निवडणुकांसाठी पारंपारीक पध्दतीने निवडणुक कार्यक्रम जालना जिल्ह्यात राबविण्यात येणार असल्याने जालना मतदार संधातील निवडणुक कालावधीतील शांतता आणि कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अबाधीत ठेवण्यासाठी लोकप्रतिनिधत्व अधिनियम 1951 च्या कलम 135 सी तसेच मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142 (1) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारानुसार जिल्हाधिकारी जालना यांनी जिल्ह्यातील सर्व ठोक व किरकोळ देशी तसेच विदेशी मद्यविक्री अनुज्ञप्त्यांचे व्यवहार खालील दिवशी मद्य विक्रीसाठी बंद ठेवण्याचे कोरडा दिवस ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते.

वरील आदेशानुसार सदरची मतमोजणी पुढे ढकल्याने दि.22 डिसेंबर 2021 चा कोरडा दिवस रद्द करण्याचे आदेशीत केले आहे. नवीन मतमोजणी बाबत आदेश निर्गमित करण्यात येतील. या आदेशाचे पालन सर्व अनुज्ञप्तीधारकांनी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *