ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

जलजागृती सप्ताहानिमित्त साताऱ्यात 19 मार्च रोजी सायकल रॅलीचे आयोजन

March 19, 202213:39 PM 32 0 0

सातारा हिरकणी(विदया निकाळजे): जलजागृती सप्ताहानिमित्त कार्यकारी अभियंता, सातारा सिंचन विभाग, सातारा यांच्या मार्फत दि. 19 मार्च 2022 रोजी सकाळी 7.30 वाजता सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही सायकल रॅली सिंचन भवन येथून रहिमतपूर रोड – पोवईनाका – नगरपरिषद कार्यालय – राजवाडा – एस.टी.स्टँड – भूविकास बँक – जुने आर. टी. ओ. ऑफिस – पोवईनाका – जिल्हाधिकारी कार्यालय – सिंचन भवन या मार्गाने नियोजित आहे.
या सायकल रॅलीसाठी उत्सुक अधिकारी, कर्मचारी व नागरिक यांनी सहभाग नोंदवावा. या रॅलीमध्ये सहभागी नागरिकांना शासनातर्फे प्रमाणपत्र वितरीत केले जाणार आहे. सायकल रॅलीशी संबंधित सविस्तर माहितीसाठी व सहभाग नोंदविण्यासाठी विनय नाईक संपर्क क्र.7588865070 व शाखा अभियंता राजेंद्र तांबे संपर्क क्र. 9623446079 यांच्याशी संपर्क साधावा.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *