ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

स्व.राजीवभाऊ जयंती युवक प्रेरणा दिनानिमित्त राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविदयालयात भव्य रक्‍तदान शिबिराचे आयोजन

September 23, 202115:24 PM 56 0 0

जालना दिनांक 22/09/2021 रोजी जालना येथीत्ल राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविदयालरयात संसदरत्न स्व.राजीवजी सातव यांच्या जयंती निमित्त भव्य रक्‍तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराचे मुख्य संयोजक मा.प्रा.सत्संगजी मुंढे, सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी तथा उपाध्यक्ष,भ.शि.प्र.मंडळ गेवराई आणि राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविदयांत्रय यांच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.आ.डॉ.नारायणराव मुंढे, जेष्ठ काँग्रेस नेते तथा,अध्यक्ष भ.शि.प्र.ममंडळ गेवराई हे होते. या कार्यक्रमाचे उदघाटन मा.आ.राजेशभैया राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मा.मनोज बागडी,राष्ट्रीय समन्वयक अखित्र भारतीय काँग्रेस कमिटी अनुसुचित जाती विभाग, मा.जितेंद्रजी देहाडे, सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, मा.विजयजी कामड, काँग्रेस नेते, श्री.पवनः डोंगरे, श्री.नारायण वाढेकर आणि प्राचार्य डॉ. सुंनदा तिडके हे उपस्थित होते.


संसदरत्न राजीवजी सातव यांच्या जयंती दिन हा युवक प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा.प्रा.सत्संगजी मुंढे, सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी तथा उपाध्यक्ष,भ.शि.प्र.मंडळ गेवराई यांनी केले. कार्यक्रमाची प्रेरणा ही स्व.राजीव सातव यांचे विचार आणि काम करण्याची हातोटी ही सर्वांना प्रेरणा देणारी आहे. यांचा विचार चिरंतर ठेवण्यासाठी आम्ही . काम करत राहू असे अभिवचन त्यांनी आपल्या प्रास्ताविकपर संदेशात दिलें. मा. जितेंद्रजी देहाडे यांनी स्व.वित्लासराव देशमुख यांच्या नंतर मराठवाडा विभागाचा समर्थ नेता आपण गमवला’ आहे, त्यांचे सामान्य कार्यकर्त्याला दिशा आणि शक्‍ती देण्याची गुण विलक्षण होते असे सांगितले. कार्यक्रमाचे उदघाटक मा.आ.राजेशभैया राठोड यांनी असे सांगितले की, , मा.खा.राहूल गांधी यांच्या आदेशानुसार स्व.राजीव सातव हे रांगेतील शेवटच्या सामान्य कार्यकर्त्याला बळ देण्याचे काम करत असत. स्वतःच्या वाढदिवसाच्या दिवशी दिल्ली येथे शेतक- यांसाठी आंदोलन करणारे नेते हे राजीव सातवच असू शकतात अशा आठवणी त्यांनी सांगितल्या. प्रमुख पाहुणे मा.मनोज बागडी राष्ट्रीय समन्वयक अखिल भारतीय काँग्रेस कमिटी अनुसुचित जाती विभाग, यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. आपण सर्व स्व.राजीव सातव यांचे वैचारीक वारसदार आहोत.’ सामान्य कार्यकर्त्यांसाठी’ काम करणे हे आपले कर्त्यव्य आहे. जे वंचित आहेत त्यांना संधी देणे ही काँग्रेस पक्षाची भूमिका आहे.आजच्या परिस्थतीत संविधान संवर्धनाची जबाबदारी ही आपल्यावर आहे.काँग्रेस पक्षाने भारतीय राज्यघटना लिहण्याची संधी ही डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी उपलब्ध करुन दिल्रेली आहे. आणि त्या संविधाने रक्षन. करण्यासाठी काँग्रेस कटिबध्द आहे असे सांगितले. कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप मा.आ.डॉ.नारायणराव मुंढे, जेष्ठ काँग्रेस नेते तथा,अध्यक्ष भ.शि.प्र.मंडळ गेवराई यांनी केला. यावेळी बोलत असतांना स्व.राजीव सारतुव यांच्या वडीलांसोबत . कार्यकर्ते. म्हणून कार्य केले त्यांच्या मातोश्री माजी मंत्री रजनिताई सातव यांच्या सोबत काम केले, सातव परिवारा सोबत पारंपारीक कोटुंबिक संबधाच्या कोटुबिक अठवणीचा उजाळा केला. काँग्रेस पक्ष हा गोरगरिबांना दलित, वंचितांना सोबत घेवून चालणारा पक्ष आहे आणि तोच पक्ष सर्वसामान्यांना न्याय देवू शकतो असा विश्‍वास व्यक्‍त केल्रा. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.लहु दरगुडे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री.संतोष साबळे यांनी केले. या कार्यक्रमामध्ये दुपार पर्यंत: 53 रक्‍तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्‍तदान केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविदयालयाच्या प्राचार्या डॉ.सुनंदा तिडके, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रा.डॉ.सोमीनाथ खाडे,प्रा.भेमराव वाघ,प्रा.डॉ.आलिया कोसर, प्रा.विठठत़ गाडेकर यांनी कार्यक्रम यंशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. यावेळी महाविदयालयातील बहुसंख्य प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांची उपस्थिती होती.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *