जालना । सांस्कृतिक प्रकोष्ठ महाराष्ट्र प्रदेश,भाजपाच्या वतीने द्विस्तरीय “शिवगान स्पर्धा” आयोजित करण्यात आलेली आहे.ही स्पर्धा छत्रपती शिवरायांवरील पोवाडा, पाळणा, शिवस्फूर्तीगीत, आरती, ओवी, ललकारी, अभंग आदी प्रकारच्या गीतांची आहे. स्पर्धेची प्राथमिक फेरी (दि. 9) फेब्रुवारी मंगळवारी सकाळी 10 वाजता बाबासाहेब आंबेडकर सभागृह, टाऊन हॉल येथे होणार आहे. ६ फेब्रुवारी नाव नोंदणीची अंतिम तारीख आहे.
स्पर्धा सर्वांसाठी खुली असून यात महाराष्ट्रातील कोणत्याही नागरिकास सहभाग घेता येईल. स्पर्धेत कोणतेही एक गीत गाता येईल. स्पर्धेची प्राथमिक फेरी जिल्हास्तरावर होणार असून अंतिम फेरी राज्यस्तरावर होईल. स्पर्धेत मराठी,हिंदी व संस्कृत भाषेतील गीत सादर करता येईल. गीत स्वरचित असेल तर विशेष प्राधान्य देण्यात येईल. स्पर्धकांनी प्रवेशिकेच्या वेळी गीताची प्रत देणे आवश्यक आहे. सादरीकरनाची काल मर्यादा वैयक्तिकसाठी -किमान ३ ते ७ मिनिटे तर सांघिकसाठी – ५ ते ८ मिनिटे ठेवण्यात आली आहे. अंतिम फेरी (दि. 19) फेब्रुवारी शुक्रवारी शिवजयंतीदिनी अजिंक्यतारा गड जि.सातारा येथे होईल. तरी या स्पर्धेत तमाम शिवभक्त,कलावंत,रसिकांनी प्रचंड संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांकडून करण्यात आले आहे. स्पर्धकांनी वेळेआधी अर्धातास येऊन आपली नोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच सादर करत असलेल्या गीताची प्रत, स्पर्धकांची, वादकांची नावे, यांची यादी जोडणे आवश्यक आहे. व्हॉट्स ॲप द्वारे नोंदणी करण्यासाठी
शुभांगी देशपांडे – 9860058408
आनंदी अय्यर – 8624028372
या क्रमांकांवर संपर्क साधावा.
Leave a Reply