ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

जागतिक महिला दिनानिमित्त मोठीजुई शाळेत किशोरवयीन मुलींसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन

March 13, 202212:18 PM 37 0 0

उरण (संगीता ढेरे ) : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून लायन्स क्लब उरण व पंचायत समिती उरण शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळा मोठीजुई या शाळेत किशोरवयीन मुलींसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या आरोग्य शिबिरात उरणमधील प्रसिद्ध समाजसेविका डॉक्टर प्रीती गाडे स्त्रीरोग तज्ञ, लायन्स क्लबचे प्रेसिडेंट लायन नरेंद्रजी ठाकूर तसेच दंत चिकित्सक श्रीमती शिवानी गाडे व लायन्स क्लब टीम तसेच पंचायत समिती उरणच्या विषय साधन व्यक्ती ज्योती ठाकूर, शाळेचे मुख्याध्यापक सुभाष म्हात्रे , सहशिक्षिका रंजना म्हात्रे , संजय होळकर , दर्शन पाटील , संदीप गावंड , शर्मिला पाटील, यतीन म्हात्रे, ज्योती बामनकर उपस्थित होते. सुरुवातीला सर्व उपस्थितांचे गुलाबाची रोपे देऊन शाळेच्या वतीने स्वागत करण्यात आले.

त्यानंतर नरेंद्र ठाकूर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आजही अशा प्रकारच्या मराठी शाळा पहायला मिळतात, शाळेचा परिसर, वर्ग सुशोभीकरण , शिक्षक सहकार्य व कार्यक्रमाचे उत्तम प्रकारे आयोजन पाहून समाधान व्यक्त केले व लायन्स क्लबच्या वतीने शक्य तेवढे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तदनंतर लायन्स प्रीती गाडे यांनी किशोरवयीन मुलींना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले.मुलींची मानसिकता,बदलते वय,पुरक आहार, शारीरिक बदल, गुड टच बॅड टच व इतर महत्त्वाच्या बाबींवर सखोल चर्चा केली. तसेच श्रीम.शिवाजी गाडे यांनी शाळेतील सर्व उपस्थित मुलांची दंतचिकित्सा केली. तर कल्पना मॅडम व त्यांची टीम यांनी नेत्रचिकित्सा केले. नंतर मुलांना चॉकलेट वाटप करण्यात आले. शेवटी शिक्षक संजय होळकर यांनी आभार प्रदर्शन मानले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *