ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

वयानुसार व्यायाम पद्धती’ विषयावर राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन

September 8, 202113:17 PM 7 0 0

सातारा दि. ०८ सप्टेंबर २०२१ रयत शिक्षण संस्थेच्या सातारा येथील सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय आणि छत्रपती शिवाजी कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने दोन्ही कॉलेजमधील शारीरिक शिक्षण विभाग व अंतर्गत मूल्यमापन कक्ष यांच्या वतीने ‘ वयानुसार व्यायाम पद्धती’ या विषयावर बुधवार दि. ०८ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी ११.३० वाजता राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन करण्यात आल्याची माहिती रयत शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर आणि संस्थेचे ऑडिटर प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांनी दिली.


जागतिकीकरणानंतर बदललेली जीवनपद्धती आणि आरोग्याचे नवे प्रश्न या अनुषंगाने व्यायाम पद्धती संबंधी समाजाला शास्त्रशुद्ध मार्गदर्शन करण्याच्या हेतूने वेबिनारचे आयोजन करण्यात आले असून पुणे येथील आगाशे कॉलेज मधील तज्ञ मार्गदर्शक डॉ. शरद आहेर वेबिनारमध्ये मार्गदर्शन करणार आहेत.
तरी सातारा आणि परिसरातील नागरिकांनी या वेबिनारमध्ये सहभागी होऊन मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन अंतर्गत मूल्यमापन कक्षाच्या प्रमुख डॉ. जयश्री आफळे, शारीरिक शिक्षण विभागाचे प्रमुख प्रा. विक्रमसिंह ननावरे व महिला महाविद्यालयाच्या शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख प्रा. सौ. स्मिता कुंभार यांनी केले आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *