ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

दर्पण दिनानिमित्त एक दिवसीय शिबीराचे आयोजन

December 26, 202116:37 PM 38 0 0

जालना । प्रतिनिधी – बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त तसेच पहिले मराठी वृत्तपत्र दर्पण हे 6 जानेवारी 1832 मध्ये सुरु केले होते. याची आठवण म्हणून महाराष्ट्रात दर्पण दिन साजरा करण्यात येते. या दर्पण दिनानिमित्त येत्या 6 जानेवारी 2022 रोजी प्रेस कॉन्सील ऑफ महाराष्ट्र जालना जिल्ह्याच्यावतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोना नियमांचे पालन करून दर्पण दिन साजरा करण्यात येणार असल्याची माहिती प्रेस कॉन्सील ऑफ इंडियाचे जालना जिल्हाध्यक्ष दीपक शेळके यांनी दिली आहे.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, गुरुवार (दि 6 जानेवारी 2022) रोजी दर्पण दिनानिमित्त एक दिवसीय शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. यात सर्व पत्रकारांसाठी कोव्हीड 19 लसीकरण, पीसीएम जिल्हास्तरीय पुरस्कार, प्रेस फोटोग्राफर यांचा सत्कार, वृत्तपत्र विक्रेते, पेपर वाटप करणारी मुले यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच पीसीएमच्या सर्व सभासदांचे अपघाती विमा काढण्याचे काम सध्या सुरू असून दर्पण दिनानिमित्त त्यांना ते विमा देण्यात येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे पीसीएमचे जिल्हास्तरीय पुरस्कार हे जालन्यातील दिवंगत पत्रकारांची आठवण म्हणून त्यांच्या नावाने देण्यात येणार आहेत. यात स्व. शशीकांत पटवारी जिल्हारत्न पत्रकार पुरस्कार, स्व. दिगंबरराव शिंदे जालना भूषण पत्रकार पुरस्कार, स्व. लक्ष्मणराव पायगव्हाणे ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार, स्व. गणेश जळगावकर उदयोनमुख पत्रकार पुरस्कार, स्व. संतोष भालेराव उदयोनमुख संपादक पुरस्कार, स्व. रमेश पाटील उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार, स्व. श्रीकृष्ण भारुका उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार या पुरस्कारांचा समावेश आहे. या पुरस्काराची घोषणा मंगळवार (दि 4 जानेवारी 2022) रोजी करण्यात येणार असल्याची माहीतीही श्री शेळके यांनी दिली आहे.
कोव्हीड 19 प्रतिबंधक नियमांचे पालन करून हा कार्यक्रम संपन्न करणार असून गुरुवार (दि 6) सकाळी 10 ते 5 या वेळेत शहरातील संभाजी नगर कॉर्नर औरंगाबाद रोड स्थित आयएमए हॉल येथे हे शिबीर होणार आहे. या शिबीरात जिल्ह्यातील पत्रकारांनी उपस्थित राहावे असे आवाहन प्रेस कॉन्सील ऑफ महाराष्ट्र राज्य सरचिटणीस विजयकुमार सकलेचा यांच्यासह जालनाचे जिल्हाध्यक्ष दीपक शेळके व जिल्हा पदाधिकार्‍यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *