ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

मार्चमध्ये अखिल भारतीय आंबेडकरी महिला साहित्य संमेलनाचे आयोजन

February 7, 202215:14 PM 41 0 0

नांदेड – अ. भा.आंबेडकरी साहित्य आणि संस्कृती संवर्धन महामंडळाचे तिसऱ्या अ.भा.आंबेडकरी महिला साहित्य संमेलनाचे आयोजन मार्च महिन्यात होणार असून सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या ‘आशय’ या संस्थेद्वारे अमरावती शहरात सदरील आयोजन होणार आहे असल्याची माहिती येथील साहित्यिक समीक्षक तथा अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य आणि संस्कृती संवर्धन महामंडळाचे कार्याध्यक्ष प्रज्ञाधर ढवळे यांनी दिली.
‘आशय’ संस्थेचा प्रस्ताव महामंडळाने मान्य केला असून आयोजनाची परवानगी दिली आहे. यापूर्वी महामंडळाची दोन संमेलने अनुक्रमे यवतमाळ आणि नागपूर येथे उत्साहात संपन्न झाली आहे. शहरातील महत्वाच्या कार्यकर्त्याच्या बैठकीत आयोजनासंदर्भात चर्चा करण्यात आली. यशस्वी आयोजनासाठी विविध समित्यांचे गठन करण्यात आले असून कार्यकर्ते कामाला लागले आहेत. संमेलनात परिसंवाद, परिचर्चा , पथनाट्य, मुलाखत, चित्रप्रदर्शनी , कविसंमेलन आदी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याचे महामंडळाचे निमंत्रक प्रशांत वंजारे यांनी कळविले आहे.
संमेलनाच्या तारखा लवकरच जाहीर करण्यात येणार असून यशस्वी आयोजनासाठी संजय मोखडे, वर्षा ताई गरुड, सुमेधाताई खडसे, रक्षनाताई सरदार, मायाताई वासनिक, सुनंदा बोदीले, अश्विनी गडलिंग, अंजली ढेबरे,संघपाल सरदार, राजेश गरुड, राहुल वासेकर, शाहूराव खडसे, विलास थोरात धर्मशील गेडाम, रोशन गजभिये, सुधीर ढेबरे, गुणराज भगत, सागर वासनिक आदी कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *