ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

खुरगाव येथे ६ जुलै रोजी महारक्तदान शिबिराचे आयोजन

June 30, 202112:27 PM 9 0 0

नांदेड – तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण केंद्राचे संचालक धम्मगुरू भदंत पंय्याबोधी थेरो यांच्या जन्मदिनानिमित्त ६ जुलै रोजी कोरोनाचे सर्व नियम पाळून महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच भिक्खू संघाच्या उपस्थितीत प्रशिक्षण केंद्राच्या पार्किंग परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम, अष्टपुरस्कार प्रदान, चिवरदान, ग्रंथदान, भोजनदान, धम्मदेसना, वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन आदी कार्यक्रम होणार असल्याची माहिती भंते श्रद्धानंद यांनी दिली.

https://indianfast.com/

https://indianfast.com/

ऋषिपठण बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात भदंत पंय्याबोधी थेरो यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महारक्तदान शिबिराचे आयोजन येत्या मंगळवारी सकाळी १० वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत करण्यात आले आहे. तसेच यावेळी प्रकाश नगरच्या धम्मसंदेश पथकाकडून भदंत पंय्याबोधी थेरो यांना अष्टपुरस्कार प्रदान करण्यात येईल. तसेच चिवरदान आणि शंभर ग्रंथाचे दानही श्रामणेर प्रशिक्षण केंद्रास देण्यात येणार आहे. डेल्टा प्लस विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गर्दी न करता रक्तदानाचे महत्व लक्षात घेऊन रक्तदान करण्यासाठी इच्छुकांनी प्रशिक्षण केंद्रात येऊन रक्तदान करण्यासाठी यावे असे आवाहन भिक्खू संघाच्या वतीने करण्यात आले आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *