ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी CHA चषकाचे आयोजन

March 21, 202217:02 PM 23 0 0

उरण (राघवी ममताबादे ) : उरण तालुक्यात अनेक अपघात होत असतात. व या अपघातामुळे सर्वसामान्य असलेल्या अनेक गोरगरिबांचे प्राण गेले आहेत.अपघात प्रसंगी गोरगरिबांना खूप मोठ्या आर्थिक संकटांना सामोरे जावे लागते. अश्या वेळी अपघातग्रस्त कुटुंबाचे मानसिक खच्चीकरणही खूप मोठया प्रमाणात होते.अपघातग्रस्त कुटुंबाला कोणी मदत करताना दिसून येत नाही.ट्रान्सपोर्ट क्षेत्रात सर्वेचे काम करणाऱ्या व ट्रक, कंटेनर, मालवाहतूक टेम्पो आदी अवजड वाहनांची कागदपत्रे तपासून योग्य जागी माल उतरविण्यासाठी मदत करणाऱ्या बांधवांना CHA(कस्टम हाऊस एजेंट )असे म्हणतात.उरण तालुक्यात स्थानिक भूमीपूत्र असलेले मराठी व्यक्ती या क्षेत्रात खूप मोठया प्रमाणात आहेत. उरण तालुक्यात असे CHA चे काम करणाऱ्या कामगार वर्गांना सतत फिरत काम करावे लागत असल्याने त्यांना अपघाताचा धोका जास्त आहे. अनेक CHA बांधवांचे उरण मध्ये अपघात देखील झाले आहेत. अश्या CHA बांधवांना कोणाचा आधार नसतो. दिवसभर काम करून जो पगार मिळतो त्यातच आपला संसार कसा बसा चालवावा लागतो. कठीण प्रसंगात CHA बांधवांना कोणाचा आधार नसतो.CHA बांधवांना कधी 12 तास तर कधी 24 तास काम करावे लागते.त्यामुळे उरण तालुक्यातील पूर्व विभागातील सतत होत असलेल्या अपघातग्रस्त CHA बंधूंच्या मदतीसाठी निधी उपलब्ध व्हावे या दृष्टीकोणातून न्हावा शेवा CHA संघटना तर्फे दरवर्षी CHA आधार चषकाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी रविवार दिनांक 3/4/2022 रोजी धसाखोशी मैदान, खोपटे,तालुका-उरण येथे एक दिवसीय CHA आधार चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
उरण तालुक्यातील अपघातग्रस्त CHA बधूंच्या आर्थिक मदतीसाठी निधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात येणाऱ्या CHA आधार चषकाला दरवर्षी खेळाडू, रसिक प्रेषक वर्गांचा खूप मोठा प्रतिसाद मिळत असतो. न्हावा शेवा CHA संघटनेचे अध्यक्ष नागेंद्र म्हात्रे, उपाध्यक्ष -हनुमान म्हात्रे, रुपेश भगत, दिनेश म्हात्रे, सल्लागार -बाळकृष्ण शेडगे, सुरेंद्र म्हात्रे, जनार्दन कडू, दिपक गावंड, सचिव -शशिकांत ठाकूर, समाधान पाटील, हरिष म्हात्रे, प्रशांत म्हात्रे, खजिनदार -संदिप पाटील, किरण म्हात्रे, शैलेश पाटील,मिलिंद म्हात्रे,संघटक -संपेश पाटील, दिनेश पाटील, सचिन केदारी, जितेंद्र भगत, श्याम गावंड यांच्यासह CHA संघटनेचे सर्व सदस्यांनी या CHA आधार चषकाचे आयोजन केले आहे.अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करणारी न्हावा शेवा CHA संघटना ही उरण तालुक्यातील एकमेव संघटना असून क्रिकेट क्षेत्रात या CHA संघटनेने एक नवा आदर्श समाजासमोर, खेळाडूंसमोर, क्रीडा रसिक प्रेषकांसमोर उभा केला आहे.या क्रिकेट स्पर्धाचा सर्वांनी आनंद घ्यावा असे आवाहन न्हावा शेवा सी.एच. ए. संघटनेचे अध्यक्ष नागेंद्र म्हात्रे यांनी केले आहे.ज्यांना यासाठी आर्थिक मदत करायचे आहे त्यांनी 9664771140 या नंबर वर गुगल पे करावे. अधिक माहितीसाठी अध्यक्ष नागेंद्र म्हात्रे फोन नंबर 98335 52403 यांच्याशी संपर्क साधावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *