ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

जि.प.प्रशाला जाफ्राबाद येथे बाल सभेचे आयोजन

December 12, 202112:16 PM 52 0 0

दिनांक 10 डिसेंबर शुक्रवार- जि.प.प्रशाला जाफ्राबाद येथे वर्ग सहावी मराठी विषय प्रसंगोपात उपक्रम अंतर्गत विषय शिक्षिका श्रीम. उषा चव्हाण मॅडम यांनी विद्यार्थ्यांच्या बालसभेचे आयोजन केले होते.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कार्तिक फदाट याने भूषविले.तर प्रमुख पाहुणे म्हणून ऋतिक बोर्डे ,मोहन वखरे,कु. प्रतीक्षा गाडेकर, कु.वेदिका बोर्डे हे होते. पूर्ण कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर केला.


भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त बाल सभा आयोजित केली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.दिव्या ढवळे आणि श्रवण चेके यांनी केले .तर स्वागतगीत कु. आश्विनी मोकळे व दिव्या ढवळे यांनी म्हटले.विध्यार्थ्यांनी शाळेतील सर्व शिक्षकांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार केला.विद्यार्थ्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर तसेच महात्मा ज्योतिबा फुले यांची माहिती भाषणातून दिली .कु रजाळे हिने सर्वांचे आभार मानले.शिक्षकांनी कार्यक्रम खूप छान झाल्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केल्या.सकाळपासून शाळेचे खूप उत्साहाचे वातावरण होते.फलकलेखन श्री धारे सरांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीत्यासाठी मुख्याध्यापक व तसेच सर्व शिक्षक यांचे सहकार्य लाभले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *