ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

जिल्हास्तर सिनीयर टेनिक्वाईट स्पर्धेचे आयोजन

August 18, 202215:33 PM 10 0 0

जालना (प्रतिनीधी) – जालना जिल्हा टेनिक्वाईट असोसिएशन यांच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व राष्ट्रीय सदभावना दिवसानिमीत्त जिल्हास्तरीय सिनीयर टेनिक्वाईट (रिंग टेनीस) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धा देवगिरी इंग्लीश स्कुल, गायत्री लॉन्सच्या पाठीमागे अंबड चौफुली जालना येथे दिनांक 20 ऑगस्ट 2022 शनीवार रोजी सकाळी 11 वाजल्यापासुन आयोजीत करण्यात आली आहे. जिल्हास्तर स्पर्धेत सहभागी होण्याकरीता कोणतेही प्रकारचे शुल्क आकारण्यात येणार नाही.
सदर स्पर्धेतुनच दि. 17 ते 19 सप्टेंबर दरम्यान बारामती येथे संपन्न होणार्‍या 40 व्या सिनीयर राज्य टेनिक्वाईट अजिंक्यपद स्पर्धेसाठी 6 मुले व 6 मुली यांची निवड करण्यात येईल. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी वयाची अट नाही, खेळाडुंनी सोबत आधारकार्डची झेरॉक्स सोबत ठेवावी.

अधिक माहितीकरीता संघटनेचे सचिव शेख चाँद पी.जे. मो.नं. 9822456366, जिल्हा प्रशिक्षक उमेश खंदारकर, गोवर्धन वाहुळ, सुभाष पारे, तुषार गर्जे, किरण पाटील, संतोष वाघ, नितीन जाधव, यांच्याशी संपर्क साधावा. तरी सदर सुवर्ण संधीचा जालना जिल्हयातील खेळाडुंनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा टेनिक्वाईट असोसिएशन जालनाचे अध्यक्ष माजी नगरसेवक जयंत भोसले, देवगिरी विद्या प्रतिष्ठाण चे अध्यक्ष बबन दादा सोरटी, जालना जिल्हा टेनिक्वाईट असोसिएशन जालना व जालना जिल्हा ऑलंम्पीक असोसिएशन यांच्यावतीने करण्यात आले आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *