ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन

December 27, 202116:24 PM 58 0 0

सातारा (विद्या निकाळजे) : राष्ट्रीय एकात्मता तसेच युवाच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी, सुप्त कलाचे सादरीकरण होण्यासाठी राष्ट्रीय युवा महोत्सवाचे राज्यामध्ये आयोजन करण्यात येते यामध्ये प्रत्येक राज्याचे प्रतिनिधी संघ सहभागी होतात. राज्याची संस्कृती व परंपरा जतन करण्यासाठी जिल्हा/विभाग/राज्य/राष्ट्रीय स्तरावर युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आदेशान्वये 15 ते 29 वयोगटातील युवकांसाठी जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन दि. 30 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 9.30 वाजता श्रीमंत छत्रपती शाहू. जिल्हा क्रीडा संकुल सातारा येथे ऑनलाईन पध्दतीने करण्यात येणार आहे. या युवा महोस्तवाकरीता पुढील कला प्रकार आहेत.लोक नृत्य folk dance सहभाग कलाकार संख्या 20 व वेळ 15 मिनिटे.लोकगीत folk song सहभाग कलाकार संख्या 10 वेळ 07 मिनिट.
सातारा जिल्ह्यातील महाविद्यालयातील शिक्षण घेणारे शिक्षण पूर्ण झालेले ,कला अध्यापन, विद्यार्थी, नाट्य मंडळातील कलाकार या सर्वांसाठी हे कलामंच खुले आहे. या महोत्सवातील कला प्रकारासाठी प्रवेश विनामुल्य असून प्रविण्य संपादन करणारे कलाकरांना शासनाचे प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. तरी आपली प्रवेश निश्चिती दिनांक 28 डिसेंबर 2021 पुर्वी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय या ठिकाणी प्रवेश अर्ज सादर करून करण्यात यावी. तरी जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचा युवकांनी लाभ घ्यावा. असे आवाहन युवराज नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी, सातारा यांनी केले आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *