ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने तालुका विधी सेवा समिती उरण यांच्यामार्फत कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन

October 5, 202113:01 PM 27 0 0

उरण ( संगिता पवार ) महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचेमार्फत रविवार (दि. ३ )रोजी तालुका विधी सेवा समिती, उरण येथे कायदेविषयक जनजागृती करण्यासाठी सकाळी १०.०० वाजता दिवाणी न्यायालय क.स्तर, उरण, येथे कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले.

सदर शिबिरामध्ये उरण न्यायालयातील दिवाणी न्यायाधीश माननीय श्री. निलेश एम. वाली, दुसरे सह दिवाणी न्यायाधीश प्रियांका एन. पठाडे तसेच ॲड. पराग म्हात्रे, ॲड. राजेंद्र भानुशाली, ॲड. प्रतिभा भालेराव व उरण न्यायालयातील विधिज्ञ, न्यायालयीन कर्मचारी, पोलिस कर्मचारी व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. ॲड. पराग म्हात्रे, व ॲड. राजेंद्र भानुशाली यांनी उपस्थितांना कायदेविषयक मार्गदर्शन केले. दुसरे सह दिवाणी न्यायाधीश प्रियांका एन. पठाडे यांनी नालसा अंतर्गत येणाऱ्या विविध योजनांचे महत्व पटवून दिले. तसेच अध्यक्षीय भाषणात मा. दिवाणी न्यायधीश श्री. निलेश एम. वाली यांनी केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांबाबत तसेच लोकअदालतबाबत उपस्थितांना माहिती देऊन त्याचे महत्व पटवून देऊन योग्य ते मार्गदर्शन केले. तालुका विधी सेवा समिती, उरण यांचे मार्फत कायदेविषयक जनजागृती करत आजादी का अमृत महोत्सव साजरा करण्यात आला.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *