ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

उरण येथे मशाल मोर्चा चे आयोजन

August 11, 202121:31 PM 9 0 0

उरण ( संगिता पवार )  : नवी मुंबई अंतरराष्ट्रीय  विमानतळाला  नाव द्यावे  यासाठी सोमवार (दि. ९ ) आॅगस्ट २१ रोजी उरण शहर सह ग्रामीण भागात मशाल मोर्चा चे  आयोजन करण्यात आले होते . ग्रामीण  भागात ,उरण पूर्व भागात हि मशाल मोर्चा काढण्यात आला होता .पूर्व भागात पूर्व विभाग अध्यक्ष शशी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मशाल मोर्चा काढण्यात आला होता .भाजपा उरण तालुका उपाध्यक्ष मुकुंद गावंड यांच्या सह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते . 


मशाल मोर्चा ला सुरुवात उरण शहरातील  राघोबा देव मंदिर पासून सुरुवात आली .पुढे जरी मरी मंदिर ,बाजार पेठ ,राजपाल नाका ,गणपती चौक पुढे उरण नगरपरिषदेचे विमला तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या जवळ येऊन मोर्चा ची सांगता समारोप झाला .
नवी मुंबई अंतरराष्ट्रीय  विमानतळाला  दि .बा .पाटील साहेबांचे नाव मिळालेच पाहिजे ,दि बा .पाटील साहेब अमर रहे  अमर रहे , जमीन आमच्या  हक्काची नाही कुणाच्या बापाची अश्या घोषणा मशाल मोर्चा त देण्यांत आल्या .
आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली  मशाल मोर्चा उरण शहरात काढण्यात आला होता .
या वेळी आमदार महेश बालदी ,नगराध्यक्ष सायली म्हात्रे ,उपनगराध्यक्ष जयविन कोळी ,उरण तालुका भाजपाध्यक्ष तथा नगरसेवक  रवी भोईर ,उरण शहर अध्यक्ष तथानगरसेवक कौशिक शाह , नगरसेविका जानव्ही पंडीत ,भाजपा उरण शहर युवा अध्यक्ष निलेश पाटील ,कॉंग्रेसच्या सीमा घरत .नयना पाटील ,नगरसेवक  राजेश ठाकूर ,नगरसेवक नंदु लांबे ,हितेश शाह ,अजित भिंडे ,मनन पटेल ,हस्तीमल मेहता , सुरज ठवले ,संतोष ओटावकर ,मकरंद पोतदार ,माजी नगरसेवक राजेश कोळी ,पुरोशोतम सेवक ,सागर मोहिते ,आदी उपस्थित होते .

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *