जालना (प्रतिनिधी) – जालना जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत होत असलेली वाढ आणि नागरीकात कोरोना महामारीच्या संदर्भात असलेले संभ्रम या बाबत जनजागृती करण्यासाठी उज्वल बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने दि. 21 मार्च 2021 रोजी सायंकाळी 8.30 वाजता ऑनलाईन मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
कोरोना महामारी, त्याची लक्षणे, उपाय व काळजी कशी घ्यावी या संदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार असून नागरीकांच्या मनात असेले प्रश्न आणि भितीचे निवारण यावेळी करण्यात येणार आहे.
ग्रामीण भागात गावपातळीवर कोरोनाच्या संदर्भात अनेक चर्चा आहेत. काहीजन कोरोना नसल्याचे सांगतात तर काहीजन कोरोनाला फारच घाबरुन जातात. कोरोनाने आता ग्रामीण भागात मान वर काढली असून रुग्णसंख्या ग्रामीण भागात देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ही रुग्णसंख्या कमी करणे व काळजी घेण्यासाठी शासनाच्या वतीने अनेक योजना आखल्या जात आहेत. त्यात ग्रामीण भागातील नागरीकांचे योगदान वाढावे यासाठी या विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या ऑनलाईन शिबीराचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन सरपंच सौ. ज्यातीताई राऊत, संस्थेच्या अध्यक्षा सौ. करुणाताई मोरे, रोहीणी बळप, अच्युत मोरे, बालाजी बळप, भागवत राऊत, अंकुश काळे, बळीराम गायकवाड, रामकृष्ण हिवाळे यांनी केले आहे.
Leave a Reply