ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त काँग्रेस पक्षातर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन

January 28, 202214:30 PM 48 0 0

जालना (प्रतिनिधी) : जालना जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने दि. 30 जानेवारी 2022 रविवार रोजी राष्ट्रपिता महत्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जुना जालना गांधी चमन येथे आयोजीत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जालना जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख हे राहणार असून याप्रसंगी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस तथा जिल्हा प्रभारी रामकिशन ओझा, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आ. कैलास गोरंट्याल, आ. राजेश राठोड, माजी आ. सुरेशकुमार जेथलिया आणि प्रदेश कॉग्रेसचे आजी-माजी पदाधिकारी, माजी जिल्हाध्यक्ष यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
सकाळी 11 वाजता महत्मागांधी यांच्या पुतळ्यासमोर अभिवादनाचा कार्यक्रम व त्यानंतर अहिंसा, त्याग, सात्यागृह या शस्त्रांचा वापर करून जग जिंकता येते हे गांधीजींनी दाखवून दिले आहे. त्यांचा राष्ट्रीय एकात्मता आणि शांतीचा संदेश घेण्यासाठी ईश्‍वर अल्ला तेरो नाम सबको संमती दे भगवान या भजनाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे. याप्रसंगी उपस्थित राहण्याचे आवाहन जालना जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष राजेंद्र राख, शहर काँग्रेसचे अध्यक्ष शेख महेमूद, तालुकाध्यक्ष वसंत जाधव, आघाडीचे जिल्हाध्यक्षा विमलताई आगलावे, राहुल देशमुख, बदर चाऊस, दिनकर घेवंदे, विजय जऱ्हाड, आनंद लोखंडे, जावेद बेग, शेख शमशु, वैजिनाथ डोंगरे, ॲड. जयश्री किंगरे, शितलताई तनपूरे, नारायण वाढेकर, शिवाजी इंगळे, शाहिर नळणीकर, नंदाताई पवार, चंदाताई भांगडीया, मंगलताई खांडेभराड आदींनी केले आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *