ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

जागतिक योग दिनानिमित्त जालना येथे धरतीधनच्या वतीने योगयज्ञाचे आयोजन

June 17, 202122:49 PM 68 0 0

जालना- जागतिक योगदिनानिमित्त जालना जिल्ह्यातील धरतीधन ग्रामविकास संस्था आणि महा एनजीओ फेडरेशन महाराष्ट्र व नेहरू युवा केंद्र (युवा कार्यक्रम व क्रिडा मंत्रालय भारत सरकार) यांच्या संयुक्त विद्यमाने 21 जून रोजी चंदनझीरा येथील श्री शिवाजीराव शेंडगे विद्यालयात योगयज्ञाचे आयोजन आयोजन करण्यात आले असल्याची माहीती धरतीधनचे अध्यक्ष मिलिंद सावंत यांनी दिली. महा एनजीओ फेडरेशन , महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीने जागतिक योग दिनानिमित्त दिनांक 21 जून रोजी भव्य योग यज्ञ चे आयोजन संपूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी व एकाच वेळी 100 ठिकाणी करण्यात आले आहे. महा एनजीओ फेडरेशन ही महाराष्ट्रातील 2000 संस्थांचे संघटन करणारी संस्था आहे.

जागतिक योग दिनानिमित्त महा एनजीओ फेडरेशनच्या 100 सदस्य संस्था राज्यभरात एकाच वेळी योग शिबीर घेणार आहेत. सदरील योग शिबिरे श्री श्री रविशंकरजी यांच्या बेंगलोर येथील तज्ञ योग प्रशिक्षिका रुची सूद यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहेत. पुणे येथील महा एन जी ओ फेडरेशन च्या कार्यालयातून ऑनलाइन लिंक द्वारा घेण्यात येणारे हे शिबीर राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी प्रोजेक्टर वर दाखवून 25 ते 50 व्यक्तींच्या सहभागाने योगासने ,ध्यान , प्राणायाम व देशभक्तीपर गीतांचे श्रवण या उपक्रमांनी साजरे केले जाणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती श्याम जी जाजू ( उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी) हे मार्गदर्शन करणार आहेत. त्याचबरोबर बाळा नांदगावकर( महाराष्ट्रनवनिर्माण सेना) हेसुद्धा त्यांचे मनोगत सांगणार आहेत. आर्ट ऑफ लिविंग या संस्थेचे अंकित बत्रा हे त्यांचे सुमधुर आवाजात देशभक्तीपर गीत सादर करणार आहेत. या कार्यक्रमात योगशिक्षिका श्रीमती कल्पना पंडीत या स प्रात्याक्षिक मार्गदर्शन करणार आहेत. राज्यातील कोरोनाजन्य परिस्थितीचा विचार करून सर्व नियमांचे पालन करून ही शिबिरे आयोजित करणायत येणार आहेत. कोरोना हा आजार मनुष्याच्या फुप्फुसांवर आघात करतो. योगा व प्राणायामानी फुप्फुसांची कार्यक्षमता वाढते तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढते. या शिबिरांचा निश्चितच कोरोना पासून बचाव तथा कोरोनामुक्ती साठी उपाय म्हणून उपयोग होवू शकतो. म्हणून या शिबिराचा जास्तीत जास्त व्यक्तींनी सहभागी होऊन लाभ घ्यावा असे आवाहन महा एन जी ओ फेडरेशन चे संस्थापक शेखर मुंदडा , मुख्य कार्यवाहक विजय वरुडकर , उपक्रम प्रमुख गणेश बाकले व मुकुंद शिंदे यांच्यासह धरतीधनचे अध्यक्ष मिलिंद सावंत, मुख्याध्यापक श्री. बाळासाहेब आबुज यांनी केले आहे. सहभागी व्यक्तीना सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे. कार्यक्रमाची सांगता महा एनजीओचे शशांक ओंबासे यांच्या पसायदानाने होणार आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *