ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

अनाथ गरीब 500 मुलींना मोफत पोलिस प्रशिक्षण संस्थेमार्फत देणार-आ. कैलाश गोरंट्याल

December 15, 202015:47 PM 69 0 0

जालना(प्रतिनिधी) जालना येथील स्वर्गीय भुदेवी किशनराव गोरंट्याल क्रिडा प्रबोधनीच्या मार्फत अनाथ गरीब 500 मुलींना मोफत पोलिस प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची घोषणा आमदार कैलाश गोरंट्याल यांनी केली. 12 डिसेंबर रोजी जूना जालना, नूतनवसाहत येथील सिध्दीविनायक बाल रूग्णालय समोर आमदार कैलाश गोरंट्याल यांच्या हस्ते स्वर्गीय भुदेवी किशनराव गोरंट्याल क्रिडा प्रबोधनीच्या शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी डॉ. अशिष राठोड, डॉ. प्रदिप हुशे, नगरसेवक संदीप खरात, रंजीत मगरे, ईश्‍वर गायकवाड, देविदास गायकवाड, किरण चव्हाण आदिंची उपस्थिती होती. संस्थेमार्फत 500 अनाथ मुलींना पोलिस बनविण्याचे प्रशिक्षण देणार असल्याचे सांगितले. तर नगराध्यक्षा सौ. संगीता गोरंट्याल म्हणाल्या मुलींना गर्भात मारू नका, बालविवाह करू नका, स्व. भुदेवी किनराव गोरंट्याल क्रिडा प्रबोधनी शहरातील गोरगरीब मुलींचा सांभाळ करण्यासाठी तत्पर आहे. यावेळी अक्षय गोरंट्याल यांनीही मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास संचालिका आरती गणेश दाभाडे, कोच गणेश मधुकर दाभाडे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *