ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

‘आमची घरं तोडण्याचं काम सुरु, आम्ही कुठे जायचं?’, आमच्या माणसांना पोलिस मारतायत, चिमुकल्याचा आर्त सवाल

June 24, 202112:41 PM 67 0 0

पुणे : बिल्डरच्या फायद्यासाठी आंबिल ओढ्याचा नैसर्गिक प्रवाह बदलण्याचा घाट घातल्याचा आरोप करत पुण्यात स्थानिक नागरिकांनी आंबील ओढ्यातील घरांच्या तोडफोडीला मोठा विरोध केला आहे. आंबिल ओढ्यात घरे पाडण्याच्या कारवाईला सुरुवात झाल्यानंतर तेथील नागरिकांनी प्रशासनासमोर गयावया केली. पण प्रशासनाने कुणाचीही बाजू न ऐकता आपली कारवाई सुरुच ठेवली. याचदरम्यान मोठा गोंधळ पाहायला मिळाला. एक चिमुकला माध्यमांसमोर आपली व्यथा मांडत होता. सकाळपासूनच प्रशासन आणि पोलिसांनी कशी कारवाई केली, याची माहिती देताना चिमुकल्याला अश्रू अनावर झाले. बोलता बोलता तो धायमोकलून रडायला लागला.

आमची घरं तोडण्याचं काम सुरु, आमच्या माणसांना पोलिस मारतायत, आम्ही कुठे जायचं?
“आमची घरं तोडण्याचं काम सुरु आहे. आमच्या माणसांना पोलिस मारतायत. आम्ही कुठे जायचं…. जी माणसं आमची बाजू पोलिसांसमोर-अधिकाऱ्यांसमोर मांडत होती… त्या माणसांना पोलिसांनी मारलंय.. त्यांना पोलीस चौकीला घेऊन गेलेत… अशा परिस्थितीत आम्ही कुठं जायचं नेमकं… असा आर्त सवाल चिमुकल्याने विचारला.


चिमुकल्याला अश्रू अनावर…
“ज्यावेळी कारवाईला सुरुवात झाली, त्यावेशी आमचे फडके काका म्हणून आहेत त्यांचा बीपी वाढला… त्यांना दवाखान्यात अॅडमिट केलंय… आमच्या इथली लोकं कुणी दत्तनगरला गेलंय… कुणी चंदननगरला गेलंय… माझे सगळे मित्र इथून गेलेत… आता इथं कुणीच नाही… खाली जाऊन बघितलं की सगळी घरं तोडलीत… आम्ही आता जायचं कुठं? असा काळीज पिळवटून टाकणारा सवाल चिमुकल्याने प्रशासनाला केला.
स्थानिक लोकांचं म्हणणं काय?
ज्या विकासकाला हे काम दिलेला आहे त्याच्यासाठी हा सगळा घाट घातला जातोय असा थेट आरोप स्थानिकांनी केला आहे नाल्याचा मूळ प्रवाह बदलल्यानंतर या ठिकाणची जागा जवळपास शंभर गुठ्यांनी वाढणार आहे, त्यामुळे थेट फायदा संबंधित विकासकाला होणार आहे, असं इथल्या स्थानिकांचे म्हणणं आहे. प्रशासनाच्या वतीने कारवाईची नोटीस काल इथल्या स्थानिकांना देण्यात आलेली आहे परंतु स्थानिकांनी ही नोटीस रात्री घेतलेली नाही आणि आज सकाळीच कारवाईला सुरुवात झालेली आहे…

आंबील ओढ्याचा वाद काय?
अतिवृष्टीमुळे पुण्यात आलेल्या पुरात आंबिल ओढ्याचं सर्वाधिक नुकसान झालं होतं. ओढ्याच्या कडेला भिंती बांधण्यासाठी पुणे महापालिकेने दुसऱ्यांदा राबवलेली निविदा प्रक्रिया वादात सापडली होती. पहिल्यांदा निविदा प्रक्रिया राबवून काम दिलेल्या ठेकेदाराने कार्यादेश घेऊनही पाच महिने काम सुरु केले नव्हते. त्यामुळे पालिकेने ही निविदा रद्द करत पुनर्निविदा प्रक्रिया राबवली. त्यानंतर पहिल्या ठेकेदाराने न्यायालयात धाव घेतली होती.

पुरामुळे पुन्हा लगतच्या वस्त्या व सोसायट्यांमध्ये पाणी शिरून नुकसान अथवा जीवितहानी होऊ नये याकरिता निविदा प्रक्रिया राबवून काम करण्याचा निर्णय घेतला होता. विकास आराखड्याप्रमाणे आंबिल ओढ्याची मोजणी करून काम सुरू करावे, अशी भूमिका घेतली होती. मात्र ठेकेदाराला आदेश दिल्यानंतरही त्याने दिरंगाई करीत कामच केले नाही.

पालिकेने त्या ठेकेदाराला नोटीस बजावली. त्यानंतरही काम सुरु न झाल्याने पुनर्निविदा प्रक्रिया राबविली. त्याची मुदत गुरुवारी संपली. शुक्रवारी नव्याने आलेल्या निविदा उघडण्यात येणार होत्या. त्यापूर्वीच ठेकेदाराने या निविदा प्रक्रियेला स्थगिती देण्यासाठी कोर्टात धाव घेतली.

आंबिल ओढ्याच्या कामासाठी ३०० कोटींचा आराखडा तयार करण्यात आला होता. सीमाभिंती काम करण्याआधी सर्वेक्षण करण्यात येणार होते. परंतु, ही पाहणी आणि मोजणी करण्याआधीच पालिकेने निविदा काढली. त्यामुळे ठेकेदाराचे हित साधण्यासाठी निविदा काढण्यात आल्या का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *